advertisement
होम / फोटोगॅलरी / स्पोर्ट्स / IPL 2021 : या 5 अनकॅप खेळाडूंवर नजर, टीम इंडियात मिळेल entry!

IPL 2021 : या 5 अनकॅप खेळाडूंवर नजर, टीम इंडियात मिळेल entry!

आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या 5 अनकॅप खेळाडूंनी यावर्षी चांगली कामगिरी केली तर त्यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

01
आयपीएलच्या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेची फायनल 30 मे रोजी खेळवण्यात येईल. यंदाच्या वर्षी पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या 5 अनकॅप खेळाडूंनी यावर्षी चांगली कामगिरी केली तर त्यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

02
मोहम्मद अझरुद्दीन : 27 वर्षांचा केरळचा क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात अझरुद्दीन चर्चेत आला जेव्हा त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत दुसरं सगळ्यात जलद शतक केलं. अझरुद्दीनने 37 बॉलमध्येच शतक झळकावलं. बँगलोरन त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. विकेट कीपर बॅट्समन असलेल्या अझरुद्दीनने 22 प्रथम श्रेणी मॅच आणि 30 लिस्ट ए मॅच खेळल्या आहेत. 24 टी-20 मॅचमध्ये त्याने 142.27 च्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. (Mohammed Azharuddeen/Instagram)

03
शाहरुख खान : पंजाब किंग्जने शाहरुख खानला तब्बल 5.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलं आहे. 25 वर्षांच्या शाहरुखने त्याच्या मोठ्या शॉटने अनेकांना प्रभावित केलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शाहरुखने 220 च्या स्ट्राईक रेटने चार इनिंगमध्ये 88 रन केले. 19 बॉलमध्ये नाबाद 40 रन शाहरुखचा सर्वोत्तम स्कोअर होता. त्याने 5 प्रथम श्रेणी मॅचमध्ये दोन अर्धशतकांसह 231 रन केले आहेत. तर 25 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याला 44 च्या सरासरीने 484 रन करता आले. टी-20 मध्ये शाहरुखचा स्ट्राईक रेट 131.39 आहे, तसंच त्याने 293 रनही केल्या आहेत. (Shahrukh Khan/Instagram)

04
देवदत्त पडिक्कल : आयपीएल 2020 मध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यासारखे सुपरस्टार असतानाही देवदत्त पडिक्कलने बँगलोरसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. देवदत्तला उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कारही मिळाला. आयपीएलच्या 15 सामन्यांमध्ये पडिक्कलने 124.80 च्या स्ट्राईक रेटने 473 रन केले. डावखुऱ्या पडिक्कलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 737 रन केले, यात त्याने लागोपाठ 7 अर्धशतकं केली. लागोपाठ दोन मोसमांमध्ये 600 पेक्षा जास्त रन करणारा देवदत्त पहिला खेळाडू बनला. याआधी त्याने 2019 मध्ये 609 रन केले होते. (@devdpd07/Twitter)

05
ऋतुराज गायकवाड : महाराष्ट्राच्या या खेळाडूची आयपीएल 2020 मधली सुरुवात खराब होती. आयपीएलच्या सुरूवातीलाच ऋतुराजला कोरोना झाला. तसंच चेन्नईची संपूर्ण मोसमातली कामगिरीही निराशाजनक झाली, पण शेवटच्या काही सामन्यांमध्ये ऋतुराज चमकला. स्पर्धेची सुरूवात तीन खराब इनिंगने करणाऱ्या ऋतुराजने शेवटच्या तिन्ही सामन्यांमध्ये अर्धशतकं केली. ऋतुराज बँगलोरविरुद्ध 65 रनवर, केकेआरविरुद्ध 72 रनवर आणि पंजाबविरुद्ध 62 रनवर नाबाद राहिला. या मोसमातही ऋतुराज आणि चेन्नई त्याचा फॉर्म कायम राहिल अशीच अपेक्षा करत असेल. (Ruturaj Gaikwad/Instagram)

06
यशस्वी जयस्वाल : राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालसाठी मागचा मोसम निराशाजनक राहिला. तीन मॅचमध्ये 100 च्या स्ट्राईक रेटने त्याने फक्त 40 रन केले. यावर्षी मात्र ही कामगिरी सुधारायची संधी त्याच्याकडे आहे. जयस्वालने लिस्ट ए क्रिकेटमध्ये एक द्विशतकही केलं आहे, 154 बॉलमध्ये त्याने 203 रन केले होते. 2020 सालच्या अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये जयस्वालने 400 रन केले. फायनलमध्ये 88 रनची खेळी करून तो टॉप स्कोरर राहिला. विजय हजारे ट्रॉफीमध्येही मुंबईच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली. स्टीव्ह स्मिथला सोडून दिल्यामुळे आता राजस्थानच्या टीममध्ये जयस्वालला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. (Yashasvi Jaiswal/Twitter)

  • FIRST PUBLISHED :
  • आयपीएलच्या 14 व्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. तर स्पर्धेची फायनल 30 मे रोजी खेळवण्यात येईल. यंदाच्या वर्षी पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या 5 अनकॅप खेळाडूंनी यावर्षी चांगली कामगिरी केली तर त्यांच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात.

    MORE
    GALLERIES