मराठी बातम्या /बातम्या /nagpur /वयोवृद्ध कोरोना रुग्णाची आत्महत्या, नागपूरातील घटनेने खळबळ

वयोवृद्ध कोरोना रुग्णाची आत्महत्या, नागपूरातील घटनेने खळबळ

Nagpur Corona Patient Committed Suicide: कोरोना काळात वृद्ध रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. पण नागपूरमधील शासकीय रुग्णालयातून (Nagpur Hospital) एका वयोवृद्ध कोरोना रुग्णाच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे.

तुषार कोहळे, नागपूर, 30 मार्च: महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची (Coronavirus Cases in Maharashtra) आकडेवारी चिंताजनक आहे. वाढत्या संक्रमणामुळे रुग्णांमध्ये चिंता देखील वाढत आहे. अशावेळी वृद्ध रुग्णांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पण नागपूरमधील शासकीय रुग्णालयातून (Nagpur Hospital) एका वयोवृद्ध कोरोना रुग्णाच्या बाबतीत धक्कादायक बातमी समोर आली आहे. या रुग्णाने कोव्हिड सेंटरमध्येच आत्महत्या (Corona Patient Committed Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 80 वर्षीय या रुग्णाचं नाव पुरुषोत्तम गजभिये असून त्यांनी टॉयलेटमधील एक्झॉस्ट फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ही घटना घडली.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार,  सोमवारी संध्याकाळी पुरुषोत्तम अप्पाजी गजभिये कोव्हिड वॉर्डातील बाथरुममध्ये गेले होते, त्यावेळी ही घटना घडल्याची माहिती अजनी पोलिसांनी दिली आहे. साधारण साडेपाच वाजता संध्याकाळी सफाई कर्मचाऱ्याच्या लक्षात आले की बाथरुमचा दरवाजा आतून बंद आहे. त्यांनी दरवाजा ठोठावला तर आतून कुणी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांनी तो दरवाजा तोडला तेव्हा त्यांनी गजभियेंना लटकलेल्या अवस्थेत पाहिले. झोन 4 चे डेप्यूटी कमिशनर अक्षय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

(हे वाचा-कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाला दिलं एक्सपायर इन्सुलिन, भोंगळ कारभारामुळे संताप)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मार्च रोजी पुरुषोत्तम गजभिये यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ते परिसरातीलच रामबाग याठिकाणचे रहिवासी होते. व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते. दरम्यान त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल का उचललं याच कारण अद्याप अस्पष्ट आहे. अजनी पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

First published:

Tags: Corona, Covid-19, Nagpur, Person suicide, Suicide