जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Govinda Death Case : गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक; आयोजक निघाला राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष

Govinda Death Case : गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक; आयोजक निघाला राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष

Govinda Death Case : गोविंदा मृत्यूप्रकरणी आयोजकाला अटक; आयोजक निघाला राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष

विलेपार्ल्यातल्या दहीहंडीत सातव्या थरावरून पडून संदेश दळवी या युवकाचा​ मृत्यू झाला. याप्रकरणी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख याला अटक. (Govinda Death Case)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 ऑगस्ट : विलेपार्ल्यातल्या दहीहंडीत सातव्या थरावरून पडून संदेश दळवी या युवकाचा​ मृत्यू झाला होता. दरम्यान याप्रकरणी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख (36) याला अटक करण्यात आली आहे. (Govinda Death Case) गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप रियाझ शेख यांच्यावर करण्यात आला आहे. सुरुवातीला शेखवर मानवी जीवन धोक्यात कलम ३३६ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मृत्यूनंतर ३०४ (अ) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात

हे ही वाचा :  MLA Prashant Bamb : आमदाराला कॉल करून सामान्य शिक्षकाने धरले धारेवर, तुमची मुले कुठे शिकतात विचारला जाब

दहीहंडीच्या सातव्या थरावरून पडून संदेश दळवी या गोविंदाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दहीहंडी उत्सवाचा आयोजक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रियाझ शेख (३६) याला अटक केली. दहीहंडी उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदा पथकाला पुरेशी सुरक्षाव्यवस्था न दिल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. शेखने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे दळवी यांचा मृत्यू झाला तर दुसरा अद्याप कूपर रुग्णालयात दाखल आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.

कुर्ल्यातील रहिवासी असलेला संदेश दळवी पार्ल्यातील शिवशंभो गोविंदा पथकाचा सदस्य होता. पार्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात त्याचा सातव्या थरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. दहीहंडी उत्सवाचा आयोजक शेख याने दहीहंडी फोडण्यासाठीचे मनोरे रचणाऱ्या गोविंदांना कोणतीही सुरक्षाव्यवस्था दिली नव्हती.  त्यामुळे शेखवर सुरुवातीला मानवी जीवन धोक्यात आणल्याबद्दल भारतीय दंड विधान संहितेचे कलम ३३६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जाहिरात

हे ही वाचा :  Maharashtra TET Scam : टीईटी घोटाळा प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचेच नाव, थेट शिक्षणाधिकाऱ्यांनीच दिले स्पष्टीकरण

मात्र, संदेश दळवीच्या मृत्यूनंतर ३०४ (अ) मध्ये त्याचे रूपांतर करण्यात आले. शेखच्या अटकेबाबत बोलताना विलेपार्ले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नार्वेकर म्हणाले, की ‘शेखने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे दळवी यांचा मृत्यू झाला तर दुसरा अद्याप कूपर रुग्णालयात दाखल आहे.

जाहिरात

विलेपार्ले येथील वाल्मिकी चौक, बामनवाडा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विविध गोविंदा पथकांनी हंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता. अनेकांनी मानवी मनोरे उभे केले होते; मात्र आयोजन करताना आयोजकांनी गोविंदा पथकाची विशेष काळजी घेणे आवश्यक होते. तशी माहिती आयोजकांना पोलिसांकडून देण्यात आली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात