औरंगाबाद, 25 ऑगस्ट : मागच्या काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये काही आमदारांनी प्रश्नोत्तराच्या तासात काही मुद्दे उपस्थित केले. यामध्ये भाजप आमदार प्रशांत बंब यांनी अधिवेशनात शिक्षकांच्यावर एक मुद्दा मांडला यामुद्द्यावरून एका शिक्षकांना आमदार प्रशांत बंब यांना चांगलेच धारेवर धरले आहे. (MLA Prashant Bamb) आमदार बंब यांनी अधिवेशनात मांडलेला मुद्दा योग्य नसल्याचे शिक्षकाने फोन करून जाब विचारले आहे यामध्ये त्या शिक्षकाच्या आणि आमदारांच्या संभाषनाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे.
भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचे विधानसभेतील शिक्षकांच्या घरभाडे संदर्भातील भाषणाबाबत एका शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्याने बंब यांना जाब विचारल्याचे संभाषण सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. घरभाडे महाराष्ट्रात शिक्षकच घेत असतात का? असा प्रश्न शिक्षकाने विचारला असता आ. बंब यांनी हा विषय शालेय शिक्षणासंदर्भात असल्याने ते बोलावेच लागते, असे सांगितले.
हे ही वाचा : मुंबई महापालिकेवरून सरवणकरांचे गौप्यस्फोट, मुख्यमंत्र्यांची एसीबी चौकशीची घोषणा, ठाकरेंची अडचण वाढणार?
संतप्त झालेल्या शिक्षकाने तुमच्या कन्नड तालुक्यात शाळेत शौचालय नसल्याने मुले उघड्यावर बसतात, शाळेचे पत्रे उडालेले आहे, असा प्रतिप्रश्न केला. यावर प्रतिउत्तर देताना आमदारांनी तुम्हा शिक्षकांना लाज वाटायला हवी. तुम्ही यासाठी जबाबदार आहात असे म्हंटल्यावर शिक्षक म्हणाला तुम्ही आमदार आहात तुम्हालाच लाज वाटायला हवी, सरकार आम्हाला काम करू देत नाही असे बाणेदारपणे उत्तर दिले.
व्हायरल झालेले संभाषण असे…
आमदार : तुम्ही खोटे बोलत आहात, तुमच्या स्वतःच्या मुलांना मराठी शाळेत पाठवले आहे का?
शिक्षक : माझी मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकली आहे.
आमदार तुमच्या एकट्याचीच असेल, मूर्खासारखे बोलू नका.
शिक्षक: तुमची मुले कोणत्या शाळेत शिकली सर? याचे उत्तर द्या.
आमदार : तुम्ही शाळेत व्यवस्थीत शिकवत नाहीत.
शिक्षक : आम्ही बरोबर शिकवतो. शासन नीट काम करू देत नाही.
आमदार : निर्लज्जसारखे बोलू नका.
हे ही वाचा : शिंदे-भाजप-काँग्रेसची अशीही ‘युती’, बालेकिल्ल्यातच ठाकरेंना एकटं पाडलं! मुंबई महापालिका सुधारणा विधेयक मंजूर
शिक्षक : आमची निर्लज्जता नाही. तुम्ही वेळोवेळी माहिती मागविता. काम करू देत नाही. माझे ऐका सर तुम्ही 5 दिवस आमदार राहिला तरी सेवानिवृत्तीनंतर 50 हजार रुपये पेन्शन मिळते.
आमदार : तुम्ही लेखी द्या.
शिक्षक : तुम्ही असे काय काम केले आहे की, आम्ही लेखी देऊ. अशी क्लीप व्हायरल होत आहे. त्यामुळे आ. बंब यांच्याविरोधात शिक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे.