नागपूर, 25 ऑगस्ट : टीईटी घोटाळ्यात अपात्र ठरलेले 7 हजार 874 शिक्षकांचा ऑगस्टपासून पगार बंद करण्यात आला असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 21 शिक्षकांचा सहभाग आहे. 2019 मध्ये 16 हजार 705 विद्यार्थ्यांनी टीईटीची परीक्षा दिली होती त्यापैकी 7 हजार 874 विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने परीक्षा उत्तीर्ण केल्याचे निष्पन्न झाले. पगार बंदीचा हा निर्णय शिक्षक संचालक कार्यालयाने घेतला आहे. दरम्यान यामध्ये एम के देशमुख या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मुलीचे टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान यामध्ये मोठा राजकीय वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांनीच खुलासा केला आहे. दरम्यान त्यांच्या मुलीचे पगार थांबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
टीईटी गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या राज्यातील शिक्षकांचे पगार ऑगस्ट महिन्यापासून बंद करण्यात आले आहेत. टीईटी परीक्षा 2019 मध्ये 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्याने या उमेदवारांना अपात्र ठरवले गेले आहे. या गैरप्रकारात अपात्र ठरलेल्या प्राथमिक शाळेच्या 576 आणि माध्यमिक शाळेच्या 447 शिक्षकांचा समावेश आहे. या अपात्र ठरलेल्या शिक्षकांचा ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचा निर्णय शिक्षण संचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं या शिक्षकांना पुढील सप्टेंबर महिन्यात मिळणारा पगार देखील मिळणार नाही.
हे ही वाचा : LIC Policy: दररोज फक्त 47 रुपयांची गुंतवणूक करून लाखो रुपये मिळवा, जाणून घ्या डिटेल्स
वेतन बंद करण्याचा निर्णयाबरोबरच या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवण्याच्या सूचना संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या अपात्र यादीतील शिक्षक हे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक किंवा सहशिक्षक पदावर कार्यरत असल्याचे आढळून आले आहे. हे शिक्षक अपात्र ठरल्यानंतर सुद्धा शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत होते. त्यामुळे या अपात्र शिक्षकांना ऑगस्टपासून वेतनापासून वगळण्यात यावे अशा सूचना शिक्षण संचालकांकडे देण्यात आले आहेत.
TET परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी 7 हजार 880 उमेदवारांकडून प्रत्येकी दीड ते दोन लाख रुपये घेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हा गैरव्यवहार मोठा असल्याचे बोलले जात आहे. 2019 साली झालेल्या टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झाले होते.
हे ही वाचा : प्रवाशांच्या आंदोलनानंतर मध्य रेल्वे बॅकफूटवर! AC Local बद्दल घेतला महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे.