जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO: ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने; ठाण्यात शाखेच्या चावीवरुन राडा

VIDEO: ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने; ठाण्यात शाखेच्या चावीवरुन राडा

VIDEO: ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने; ठाण्यात शाखेच्या चावीवरुन राडा

ठाण्यात शाखेवरुन या दोन्ही गटांमध्ये वाद झाला. कोपरी कुंभार वाड्यात ही घटना घडली आहे. शाखेत कोण बसणार यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर येत आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे 07 ऑक्टोबर : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात वेगवेगळ्या कारणांवरुन सतत वाद झाल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसतात. आता पुन्हा एकदा ठाण्यातून एक अशीच घटना समोर आली आहे. ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गट आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. ठाण्यात शाखेवरुन या दोन्ही गटांमध्ये वाद झाला. कोपरी कुंभार वाड्यात ही घटना घडली आहे. शाखेत कोण बसणार यावरुन हा वाद झाला असल्याचं समोर येत आहे. शाखेच्या चावीवरुन ठाकरे आणि शिंदे गटात याठिकाणी वाद झाला आहे. याठिकाणचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये काही महिलाही याठिकाणी उभा असल्याचं दिसतं. चालत्या वाहनातून शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचे अश्लील इशारे, महिला शिवसैनिकांनी महामार्गावर चोपले, LIVE VIDEO शाखेत कोण बसणार यावरुन दोन गटांमध्ये वाद सुरू आहे. इतक्यात याठिकाणी घोषणाबाजीही सुरू होते. सध्या याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.

जाहिरात

ठाणे- कोपरीतल्या शाखेसाठी ठाकरे- शिंदे गट भिडले आहेत. कुंभारवाडा शाखेवर दावा करण्यासाठी दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. याआधीही ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात मनोरमा नगर येथे राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. धनुष्यबाणासाठीची लढाई लांबणीवर? हे कारण देत ठाकरे गट निवडणूक आयोगाकडे आणखी वेळ मागणार नाशिक मुंबई महामार्गावरही झालेला राडा - दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावरही शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला. चालत्या वाहनातून अश्लील इशारे केले, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केला. यामुळे अश्लील इशारे केल्याचा कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच चोप दिला होता. ही घटना दसऱ्याच्या दिवशी नाशिक मुंबई महामार्गावरील शहापूर जवळ घडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: shivsena , thane
  • First Published :
जाहिरात
जाहिरात