मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /परब vs कदम वादात पडणार नाही शिवसेना, रामदास कदमांचं जाणार विधान परिषद?

परब vs कदम वादात पडणार नाही शिवसेना, रामदास कदमांचं जाणार विधान परिषद?

रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. मात्र या सर्व वादात शिवसेना पडणार नसल्याचं समजतंय.

रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. मात्र या सर्व वादात शिवसेना पडणार नसल्याचं समजतंय.

रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. मात्र या सर्व वादात शिवसेना पडणार नसल्याचं समजतंय.

मुंबई, 04 ऑक्टोबर: शिवसेनेचे (Shivsena leader) नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (ramdas kadam) यांनी परिवहनमंत्री (Transport Minister) आणि शिवसेना नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांच्या मालमत्तांबाबतची कागदपत्रे भाजपचे (bjp) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मदत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. मात्र या सर्व वादात शिवसेना पडणार नसल्याचं समजतंय. दिव्य मराठीनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातला वाद जुना आहे. त्यामुळे या वादात पक्ष म्हणून शिवसेना मध्यस्थी घेणार नसल्याचं समजतंय.

काय आहे हा भाऊबंदकीचा वाद

रामदास कदम यांचं भाऊ सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. रामदास कदम आणि सदानंद परब यांच्यात सख्य नाही. त्यामुळे परब आणि कदम यांच्यात शत्रुत्त्व उद्भवल्याचं सूत्र सांगतात.

हेही वाचा- '' अन् ध्वनी प्रदूषणाला मी जबाबदार'' ,असं का म्हणाले नितीन गडकरी

दापोलीतल्या मुरुड येथे हॉटेल साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं आहे. त्या रिसॉर्टचं कामकाज सर्व सदानंद कदम बघतात. त्या रिसॉर्ट प्रकरणावरच किरीट सोमय्यांनी आरोप केलेत.

तो आवाज माझा नाहीच, रामदास कदमांचं स्पष्टीकरण

रामदास कदम यांनी 'तो आवाज माझा नाहीच, याआधीही अशा ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात आल्या आहेत. तसंच, 'शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. आमच्याच मुख्यमंत्र्यांला खाली उतरवण्याचे पाप मी कधीच करणार नाही' असं स्पष्टीकरण कदम यांनी दिलं.

हेही वाचा- पुन्हा एकदा एकनाथ खडसेंच्या वक्तव्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ

रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना मदत केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर रामदास कदम यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर वैभव खेडकर यांच्यावर जोरदार टीका केली.

अशी ही क्लिप पहिल्यांदाच आलेली नाही. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा माझ्या आवाजात अशा क्लिप व्हायरल करण्यात आल्या होत्या. याबद्दल मी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. संजय कदम आणि वैभव खेडेकर हे दोघेही शिवसेनेत होते. दोघांनी माझ्या हाताखाली काम केलं. दोघांनी शिवसेनेशी बेईमानी करून निघून गेले. माझ्या भगव्या झेंड्याशी बेईमानी केली आणि गद्दारी केली आता त्यांना काळजी वाटत आहे' अशी टीका कदम यांनी केली. 'प्रसाद कर्वे हा माझा पीए नाही. तो एक हा सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याच्या सर्व पक्षांसोबत संबंध आहे. माझं त्यांचं असं काही बोलणं झालं नाही' असंही कदम म्हणाले.

पुढे काय होणार?

रामदास कदम यांचा एक मुलगा योगेश कदम हे दापोलीचे आमदार आहेत. तर दुसरा मुलगा युवा सेनेत सक्रिय आहे. तर रामदास कदम स्वतः विधान परिषदेवर आहेत. कदम यांनी विविध मंत्रिपदे भूषवली असून ते विरोधी पक्षनेतेही राहिलेत. त्यामुळे कदम यांच्यावर शिवसेना इतक्यात कारवाई करण्याची शक्यता धूसर आहे. मात्र ही कारवाई हळूवारपणे केली जाणार असल्याचंही समजतंय.

हेही वाचा- विरोधी पक्षनेत्यांचा पूरग्रस्त भागांचा दौरा, 'सामना'तून शिवसेनेची खोचक टिप्पणी

रामदास कदम यांची विधान परिषदेची मुदत 1 जानेवारी 2022 ला संपतेय. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व पुढे कायम ठेवण्यात येणार नसून परब यांना अडचणीत आणल्यामुळे ही शिक्षा केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे.

First published:
top videos

    Tags: Anil parab, Ramdas kadam, Shivsena