मुंबई, 02 ऑक्टोबर: आयकर अपीलीय न्यायाधिकरण मुंबई (Income Tax Appellate Tribunal Mumbai) इथे लवकरच 45 जागांसाठी मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ITAT Mumbai Bharti 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ खाजगी सचिव या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - एकूण जागा 45
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - या पद्भारतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच 120 शब्द प्रतिमिनिट या वेगानं शॉर्टहँड येणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचा ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS Office येणं आवश्यक असणार आहे.
हे वाचा - Ministry Of Defence Recruitment: संरक्षण मंत्रालय मुंबई इथे 'या' पदांसाठी भरती
इतका मिळणार पगार
वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याचा पत्ता
सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020
हे वाचा - Sassoon Hospital Recruitment: ससून सर्वसाधारण रुग्णालय पुणे 33 जागांसाठी नोकरी
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | ITAT Mumbai Bharti 2021 |
या पदांसाठी भरती | वरिष्ठ खाजगी सचिव (Sr. Private Secretary) - एकूण जागा 45 |
शैक्षणिक पात्रता | 120 शब्द प्रतिमिनिट या वेगानं शॉर्टहँड येणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाच ज्ञान असणं आवश्यक आहे |
इतका मिळणार पगार | 44,900/- - 1,42,400/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | सहाय्यक निबंधक, आयकर अपीलीय न्यायाधिकरण, तिसरा आणि चौथा मजला, प्रतिष्ठा भवन, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई -400020 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://itat.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Mumbai, जॉब