हीरे व्यापाऱ्याची 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, सापडली 2 ओळींची सुसाईड नोट

हीरे व्यापाऱ्याची 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या, सापडली 2 ओळींची सुसाईड नोट

धीरेन शाह हे डायमंड पॉलिशिंग आणि एक्स्पोर्ट कंपनीचे मालक होते.

  • Share this:

मुंबई,18 फेब्रुवारी: झवेरी बाजारातील ओपेरा हाऊसच्या 15 व्या मजल्यावरून उडी घेऊन एका बड्या हीरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. धीरेन चंद्रकांत शाह (वय-61) असे या हीरे व्यापारीचे नाव आहे. पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. माझ्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार ठरवू नये, असा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. त्यामुळे धीरेश शाह यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा... तर इंदोरीकर महाराजांसाठी संभाजी भिडे रस्त्यावर उतरून करणार आंदोलन

काय आहे प्रकरण?

मिळालेली माहिती अशी की, धीरेन शाह हे नेपियन्सी मार्गावरील मातृआशिष नामक बिल्डिंगमध्ये आपल्या कुटुंबीयासोबत राहात होते. शाह हे डायमंड पॉलिशिंग आणि एक्स्पोर्ट कंपनीचे मालक होते. प्रसाद चेंबर्सच्या सर्वात वरच्या 15 व्या मजल्यावर धीरेन शाह यांचे ऑफिस होते. याच मजल्यावरून उडी घेऊन शाह यांनी आपला जीवनप्रवास संपवला.

हेही वाचा... धक्कादायक: अवघ्या पाच महिन्यांच्या तान्हुलीवर चुलत भावाकडून बलात्कार

ऑफिस कर्मचारीने सांगितले की, धीरेश शाह मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफिसला आले होते. ऑफिसमध्ये आल्यानंतर ते टेरेसवर फिरायला गेले होते. काही क्षणातच त्यांनी 15 व्या मजल्याच्या छतावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी धीरेन शाह यांच्या ऑफिसची तपासणी केली असता त्यांच्या टेबलावर दोन ओळींची सुसाईड नोट सापडली आहे. आत्महत्येचा माझी निर्णय असून त्यास कोणालाही जबाबदार ठरवू नये, असा सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. धीरेन शाह यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे. पोलिस त्यांचीही चौकशी करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

First published: February 18, 2020, 10:10 PM IST

ताज्या बातम्या