मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर इंदोरीकर महाराजांसाठी संभाजी भिडे रस्त्यावर उतरून करणार आंदोलन

...तर इंदोरीकर महाराजांसाठी संभाजी भिडे रस्त्यावर उतरून करणार आंदोलन

'इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.'

'इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.'

'इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.'

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 18 फेब्रुवारी : कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्यावरून सुरू असलेल्या वादात आता संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेनंही उडी घेतली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने इंदोरीकर महाराज यांना पाठिंबा दिला आहे. तसंच इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौगुले यांनी दिला आहे. हभप निवृत्ती देशमुख म्हणजेच इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. त्यानंतर इंदोरीकर यांच्या बाजून आणि विरोधात असे दोन गट पडले आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनीही इंदोरीकर यांना समर्थन दिलं आहे. तर काही सामाजिक संघटना या इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी मैदानात उतरल्या आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आक्रमकपणे इंदोरीकरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. इंदुरीकरांनी व्यक्त केली दिलगिरी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी टीका होऊ लागल्यानंतर इंदोरीकरांनी पत्राद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्या खुमासदार कीर्तनामुळे लोकप्रिय झालेले कीर्तनकार इंदोरीकर महाराज देशमुख हे आपल्या एका कीर्तनातील वक्तव्यातून अडचणीत आले होते. यानंतर त्यांच्या बाजूने आणि विरोधात अनेकांनी मत व्यक्त केली होती. मात्र इंदोरीकरांनी माफी मागत भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत एक पत्र जारी केले आहे. अभिमानास्पद! शिवजयंतीच्या निमित्ताने बल्गेरियाचे राजदूत करणार मराठीत भाषण इंदोरीकर महाराजांनी आपल्या पत्रात, महिलावर्गाची माफी मागितली आहे. तसेच 26 वर्षांपासून मी किर्तनरुपी समाजप्रबोधन करत आहे. त्यामुळं माझ्या वक्तव्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असा खुलासा करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचंही इंदोरीकर महाराजांचे म्हणणे आहे. काय म्हणाले होते इंदुरीकर महाराज? 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती मुलं रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाइमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,' असं इंदोरीकर म्हणाले होते.
First published:

Tags: Indurikar maharaj, Sambhaji bhide

पुढील बातम्या