लखनौ,18 फेब्रुवारी:माणुसकीला काळीमा फासणारी तितकीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या पाच महिन्यांच्या तान्हुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. चिमुरडीच्या चुलत भावानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पप्पू असे आरोपीचे नाव असून तो सध्या फरार आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,मंदिओन पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. एका लग्न सोहळ्यासाठी पीडित चिमुरडीला घेऊन तिची आई आली होती. चिमुरडीची आई हरदोई जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीने चिमुरडीला खेळवण्याच्या बहाण्याने जवळ घेतले होते. नंतर बराच वेळ झाला तरी आरोपी पप्पू आणि चिमुरडी दिसेनासे झाले. चिमुरडीच्या आईसह नातेवाइकांनी पप्पू आणि चिमुरडीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल चार तासांनंतर लग्न मंडपापासून काही अंतरावर असलेल्या झुडपात चिमुरडी सापडली. चिमुरडी अत्यावस्थ होती. तिला तातडीने विवेकानंद रुग्णालयात हलवण्यात आले. चिमुरडीवर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचारादरम्यान चिमुरडीचा मृत्यू झाला. दरम्यान, देशात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महिला- मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा... चिनी व्हायरसला रोखणार पुणेरी लस; लवकरच होणार ह्युमन ट्रायल
निर्भया गँगरेप: चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावणार
दुसरीकडे, संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या दिल्लीतील निर्भया गँगरेप प्रकणातील चारही नराधमांना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फासावर लटकावण्यात येणार आहे. पतियाला हाऊस कोर्टाने (Patiala House Court) चारही नराधमांच्या फाशीच्या मुहुर्तावर शिक्का मोर्तब केला आहे. निर्भयाच्या (Nirbhaya Gang Rape Case) आई-वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. कोर्टामध्ये आरोपींविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. दोषी पवनला कोर्टाने दिलेल्या नव्या वकीलांकडून पहिल्यांदा पवनची बाजू मांडली. मात्र, कोर्टाने ती फेटाळून लावत नवं डेथ वॉरंट जारी केले आहे. कोर्टाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे.