Home /News /maharashtra /

मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत गाईडलाईन जारी

मोठा निर्णय! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बकरी ईद साजरी करण्याबाबत गाईडलाईन जारी

लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

    अभिषेक पांडे, प्रतिनिधी) मुंबई, 16 जुलै: राज्यात (Maharashtra news) लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बकरी ईद बाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे बकरी ईद साजरी करण्याबाबत नवी गाईडलाईन जाहीर केली असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली आहे. हेही वाचा...'भगव्याला विरोध करणारे दोन पक्ष आणि भगव्याला गुंडाळून ठेवणारा तिसरा पक्ष सत्तेत' घरीच साजरी करा बकरी ईद... कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही कारणासाठी गर्दी करणं आपल्याला परवडणारं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. मुस्लिम बांधवांनी बकरी ईद देखील घरीच साजरी करा, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. यंदा वारकऱ्यांनीही चांगला निर्णय घेत वारीला जाणं टाळलं. लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यानीही या वर्षी गणेश प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांनीही घरातच ईद साजरी करावी, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. अशा आहेत गाईडलाईन.... - बकरे खरेदी करा ऑनलाइन... -बकरे खरेदी करण्यासाठी बाजार भरणार नाही... - कुर्बानीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी करू नये... - प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांनी आपल्या नावानं ग्रीन झोनमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून कुर्बानी करून घ्यावी, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पसरणार नाही याबाबत काळजी घ्यावी... -काही एनजीओंनी याबाबत पुढाकार घेतला आहे. मुंबईबाहेर कुर्बानी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. - राहत्या घरीच बकरी ईदची नमाझ अदा करावी... दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बकरी ईद संदर्भात गेल्या आठवड्यात बैठक घेतली होती. अनेक लोकप्रतिनिधींनी ईद साजरी करण्यासाठी Lockdown च्या काळात मटण उपलब्ध कसं करून देणार याविषयी विचारणा केली होती. शक्य असेल तिथे ऑनलाईन मटण विक्रीस प्राधान्य द्यावं. मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 'हा व्हायरस रोखायचा असेल तर गर्दी होऊ देताच कामा नये. मी मुल्ला मौलवींशी यासंदर्भात चर्चा करीन, असंही ठाकरे म्हणाले होते. "वारकऱ्यांनी साधेपणाने वारी साजरी केली. लालबागच्या राजाने यावर्षी प्रतिष्ठापना न करता आरोग्योत्सव साजरा करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. आता मुस्लीम बांधवांनीही पुढाकार घ्यावा. राज्याच्या आणि जिल्ह्याच्या सीमा बंद किंबहुना नियंत्रित प्रमाणात उघडल्या आहेत. जुलै अखेरीस कोरोना प्रादुर्भाव कमी होण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले होते. हेही वाचा.. मोठी बातमी! कोरोनामुळे यंदा जेजुरीच्या खंडेरायाची सोमवती यात्रा रद्द या वेळी गर्दी रोखली नाही आणि कोरोनाची साखळी तोडली नाही तर ऑगस्टपासून हा आलेख आणखी वर जाईल. तो तसा गेला तर नियंत्रण कठीण होईल. कारण सर्व काम करणाऱ्या यंत्रणांवर ताण वाढत चालला आहे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या