मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात.. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात.. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

  • Published by:  Sandip Parolekar

मुंबई, 18 नोव्हेंबर: मुंबई भाजप (Mumbai Bjp) कार्यकारणी बैठकीचा बुधवारी सायंकाळी समारोप झाला. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी राज्य सरकारवर चौफेर टीका केली. सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं? असा थेट सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Maharashtra CM Udhav Thackeray) यांना केला आहे.

सरकारचे मंत्री आम्ही कोरोना कंट्रोलमध्ये आणला आहे, असं म्हणतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं. पाठ थोपटून घेणाऱ्यांनी  माझा सवाल आहे की, सर्वाधिक केसेस मुंबई आणि महाराष्ट्रात का?  याला जबाबदार कोण? असे सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले.

हेही वाचा...दिवाळीच्या गर्दीचा परिणाम, महिनाभरानंतर नव्या रुग्णांची संख्या वाढली

एकट्या मुंबईत 20 हजारांवर कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला. राज्यासारखी भीषण अवस्था अजून दुसरीकडे कुठेही नाही, असं सांगत कोरोनाच्या नावानं काही लोकांनी आपलंच चांगभलं करुन घेतलं,  प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाल्ले आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता फडणवीस यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरलं आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, मुंबई पालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 2022 मध्ये मुंबई सत्ता बदलायची आहे. 2017 मध्ये सत्ता बदलू शकलो असतो पण आम्ही दोस्ती निभावली, असा टोला देखील फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

फडणवीस म्हणाले की, आम्ही आधी टीका करत नव्हतो. मात्र आता भ्रष्टाचारची लक्तरे टांगल्याशिवाय राहणार नाहीत.

कोरोनाच्या नावाने कोणाला कंत्राट द्यायचे याची चिंता होती. हे सर्व उघड केल्याशिवाय राहणार नाही. वीज बिल माफीच्या घोषणेवर घुमजाव केले, गरीबाशी केलेला विश्वासघात आहे हा, गरिबांची थट्टा केली आहे. बदल्या करा माल कमवा, कशा प्रकारे बदल्यांचा बाजार यांनी मांडला आहे. हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे...

राज्याने एका नव्या पैशाचं पॅकेज दिलं नाही

भलीमोठी विजेची बिलं आली

सोमैया यांनी अनेक ठिकाणची बिलं आणून दाखवली

झोपडपट्ट्यांमध्ये राहणा-यांना ५० हजारांची वीज बिलं

गरीबाशी विश्वासघात आहे

हे विश्वासघातकी सरकार आहे

काही झाले की केंद्र सरकारकडे बोट दाखवलं

केंद्र सरकारने कर्ज देण्याची तयारी दाखवली, मग तुम्ही ते नाही घेतलं

तुम्ही खुल्या बाजारातनं पैसे उभे केले नाहीत

नितीन राऊत यांना आकडे समजतात का ?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या काळात बॅलेन्स शीट चांगल्या केल्या

आम्ही गरीबांची वसुली करत नव्हतो हे उर्जामंत्र्यांनी सांगितलं ते बरं झालं

शेतक-यांना, बारा बलुतेदा-यांना मदत नाही

पण यांचं मात्र जोरात सुरु होतं, बदल्या करा, माल कमवा

बदल्याकरता चार चार एजंट फोन करत होते

बिहारच्या यशात माझा खारीचा वाटा

बिहारमधील सामान्य माणूस गरीब कल्याण योजनांचा लाभ मिळाला

आपण सगळीकडे प्रत्येक भागात जिंकलो

लोकांना या देशात कर्मयोग आवडतो, बोलघेवडेपणा नाही

मोदींनी आत्मनिर्भर पॅकेज दिलं

मोदींचं पॅकेज सर्वसामान्यांना दिलं

जो सर्वसामान्यांसाठी काम करतो त्यांच्यामागे जनता उभे राहते

आपल्या सरकारने मुंबईतील २०-२० वर्षं खोळंबलेले प्रश्न सोडवले

ट्रान्सहार्बर रोड, कोस्टल रोड प्रकल्प मार्गी लावले

कायद्यात बदल करुन कोस्टल रोडच्या परवानग्या मिळवल्या

बीडीडी सारखे प्रकल्प केले

आता एल ॲण्ड टी सारखी कंपनी परत गेली

जो प्रकल्प सामान्य मराठी माणसांना घर देत होता, ते स्वप्न पुन्हा पाच वर्ष दूर गेला

धारावी - रेल्वेची जागा आपण ८०० कोटी रुपयांना घेतली

आपल्या काळात आपण मार्गी लावला

नवी मुंबई विमानतळाचा प्रकल्प आपण मार्गी लावला, त्याने १ टक्के जीडीपी वाढेल

मेट्रोचं मोठं नेटवर्क आपण केलं

झोपडपट्टीची पात्रता २०११ पर्यंत केली

इच्छा असेल तिथं मार्ग आणि टाईमपास करायचा असेल तर कांजुरमार्ग

आरे कारशेडचा निर्णय पृथ्वीराज चव्हाणांचा

कारशेडबद्दलचा रिपोर्ट राज्य सरकारने दाबून ठेवला

राज्य सरकारला कोणत्या अहवालाने कांजुरला कारशेड करा असं सांगितलं, फडणवीस यांचा सवाल

राज्य सरकारला कोणत्या अहवालाने कांजुरला कारशेड करा असं सांगितलं, फडणवीस यांचा सवाल

हायकोर्ट, हरित लवाद, सुप्रीम कोर्ट पर्यावरणाच्या विरोधी आहे का ?

फक्त अहंकारापोटी कांजुरमार्गला कारशेड नेण्याचा निर्णय

हा तुमचा पैसा आहे का ? जनतेचा पैसा आहे, त्याचा लुट करायचा अधिकार कोणी दिला ?

मी सीएम असताना आरे काॅलनीचा भाग इको सेन्सिटिव्ह झोन केला होता

हे कसले पर्यावरणवादी ? कोणी खाड्या बुजवल्या, अतिक्रमणं झाली

साॅल्ट पॅनची जागा वापरु देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, आता कांजुरची जागा कोणाची ?

गिरगावात मराठी माणसाला मेट्रो प्रकल्पाकरता आहे तिथेच घरं दिली

हे विकासविरोधी आहेत, याला जनतेचा पाठिंबा नाही

आज आमच्या कार्यकर्त्याला अटक होतेय, आम्ही त्याची चिंता नाही, आमचा डीएनए संघर्षाचा आहे

पोलिसांच्या बळावर तुम्ही आम्हाला दाबू शकत नाही

कार्यकर्त्यांनी पुढील काळात तयार व्हावं,

जे इंदिराना जमलं नाही ते यांना जमणार ?

पोलिसांनी कायद्याने वागावं, सरकार येतात जातात

माझ्या, पत्नीबद्दल परिवारालाबद्दल काय ट्विट केलं आम्ही काही केलं नाही

या सरकारच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली

या सरकारला जरा टाॅलरन्स शिकवा

लिबरल्स दुटप्पी आहेत

सराकरमध्ये जेव्हढा दम असेल तेव्हढा लावावा

सोमैया पुरावे घेऊन बोलतात

किरीट सोमैय्यांना कशाचं वाॅर्न करतो, हे काय बनाना रिपब्लिक आहे ?

भाजप दोन दोन हात करायला तयार आहोत

आमच्या अंगावर आलात तर खबरदार

राक्षसाचा / राजाचा जीव पोपटात

काही लोकांचा जीव मुंबई मनपात

२०२२ मध्ये मुंबई सत्ता बदलायची

२०१७ ला ती बदलवू शकला असता पण आम्ही दोस्ती निभावली

First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra