जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / दिवाळीच्या गर्दीचा परिणाम, महिनाभरानंतर नव्या रुग्णांची संख्या वाढली, मृत्यूतही झाली वाढ

दिवाळीच्या गर्दीचा परिणाम, महिनाभरानंतर नव्या रुग्णांची संख्या वाढली, मृत्यूतही झाली वाढ

1 कोरोनाच्या तिसऱ्या लाटे (Third Wave of corona) चा धोका लहान मुलांना (Children at risk) जास्त असणार आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट लहान मुलांवर जास्त अटॅक करणार आहे असं वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चं मत आहे.  जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 8 टक्के मुलांना इन्फेक्शन झालं होतं. काही मुलं हॉस्पिटलमध्ये न जाताच बरीही झाली. तर, दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त प्रभाव दिसला. आतातर, तिऱ्या लाटेत लहान मुलांना खुप जपावं लागणार आहे.

1 कोरोनाच्या तिसऱ्या लाटे (Third Wave of corona) चा धोका लहान मुलांना (Children at risk) जास्त असणार आहे. कोरोनाचा हा व्हेरिएंट लहान मुलांवर जास्त अटॅक करणार आहे असं वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)चं मत आहे. जगात कोरोनाच्या पहिल्या लाटेत 8 टक्के मुलांना इन्फेक्शन झालं होतं. काही मुलं हॉस्पिटलमध्ये न जाताच बरीही झाली. तर, दुसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त प्रभाव दिसला. आतातर, तिऱ्या लाटेत लहान मुलांना खुप जपावं लागणार आहे.

तर दिवसभरात 6,608 कोरोना रुग्णांनी कोविडवर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,30,111 एवढी झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 18 नोव्हेंबर: गेल्या महिनाभरापासून राज्यातल्या कोविड रुग्णांचा (Coronavirus) आलेख घसरत आहे. आता दिवाळीनंतर (Diwali) मात्र त्यात थोडी वाढ झालेली दिसत आहे. दिवसभरात 5,011 नव्या रुग्णांची वाढ झाली. तर मृत्यूची संख्याही 100वर गेली आहे. दिवाळीमध्ये झालेल्या गर्दीचा परिणाम म्हणून रुग्ण वाढत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दिवसभरात 6,608 कोरोना रुग्णांनी कोविडवर मात केली. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,30,111 एवढी झाली आहे. राज्यातल्या रुग्णांची एकूण संख्या ही 17,57,520 एवढी झाली आहे. दिवाळीच्या काळात सगळ्याच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सरकारने त्याबाबत इशाराही दिला होता. दरम्यान, कोरोना लस कधी येईल याची प्रतीक्षा प्रत्येकाला आहे. आतापर्यंत ज्या कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे, त्या लशी इंजेक्शनमार्फत दिल्या जातील अशा आहेत. मात्र भारतात नाकावाटे घेता येईल अशी लसही तयार केली आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्च (ICMR) आणि भारत बायोटेकने (BHARAT BIOTECH) तयार केलेली लस पुढील वर्षात उपलब्ध होणार आहे. पुढील वर्षात सिंगल डोस लस उपलब्ध होईल असा दावा कंपनीनं केला आहे. या लशीचे फक्त दोन ड्रॉप नाकात टाकले जातील. आरोग्य कर्मचाऱ्यांनी 45 सेमी बर्फातून रस्ता काढत वाचवले कोरोना रुग्णांचे प्राण यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि कोरोना महासाथीत महत्त्वाची भूमिका बजावणारे इतर कोरोना वॉरिअर्सचाही समावेश असेल.  याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेले लोक आणि इतर आजार असलेले लोक, वयस्कर व्यक्ती यांचाही समावेश असेल. लस आल्यानंतरही कोरोनाची महासाथ थांबणार नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रॉस अधानोम घेब्रियेसिस यांनी सांगितलं, फक्त लस कोरोना महासाथीला थांबवू शकत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात