मुंबई 27 ऑगस्ट : एकनाथ शिंदेंसह शिवसेना आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी कोसळलं. मात्र, यानंतरही उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसले. अनेक पदाधिकारी आणि खासदारांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली. अशात आता उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संभाजी ब्रिगेडसोबत युतीची घोषणा केली. यावर अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. Sharad Pawar Eknath Shinde : द्राक्षे गोड की आंबट ठरणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार सत्तांतरानंतर येणार एकाच मंच्यावर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीवर फडणवीसांनी फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया देत खोचक टोला लगावला आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान त्यानी सध्याच्या इतर घडामोडींवरही प्रतिक्रिया दिली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, की काँग्रेस ही डुबती नाव आहे. दरम्यान, अनिल परब यांच्या कथित रिसॉर्टवर कारवाईसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. ते मुंबईतून मांडवी एक्स्प्रेसने दापोलीच्या दिशेने रवाना झाले आहेत. याबाबतही फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबाबत काहीही बोलणं फडणवीसांनी टाळलं. याबाबत मला काहीही माहिती नाही, असं म्हणत फडणवीसांनी या प्रकरणावर काहीही बोलणं टाळलं. ‘ओळखलं का विद्यार्थ्यांनो, मला’, वर्गात झळकणार सरांचा फोटो, शिंदे सरकारचा अजब निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं होतं. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी काँग्रेसच्या सात आमदारांनी पैसे घेवून भाजपला मतदान केल्याचं धक्कादायक विधान चव्हाण यांनी केलं होतं. याबाबत विचारलं असता चव्हाण काय बोलले हे मला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दसरा मेळाव्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की मी गृहमंत्री म्हणून एवढंच सांगू शकतो, की नियमाबाहेर या सरकारमध्ये काहीच होणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.