Home /News /maharashtra /

नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेन, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेन, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.

    मुंबई, 01 ऑक्टोबर: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. दिवाळीच्या सुरुवातीला लवंगी फटाका वाजून खूप आवाज झाल्याचा आव मलिक आणतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रिव्हर मार्चच्या 4 वर्षांच्या मोहिमेदरम्यान शूटींगवेळी हे फोटो काढले आहेत. जाणीवपूर्वक माझ्या पत्नीचा फोटो पोस्ट केला, असल्याचं फडणवीस म्हणालेत. रिव्हर मार्चकडून या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे. नवाब मलिक यांचे जावई ड्रग्ज प्रकरणात अडकले त्यामुळे त्याची पूर्ण पार्टी ड्रग्ज माफिया म्हणायची का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. तसंच दिवाळीनंतर मी बॅाम्ब फोडेल असा इशारा ही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मी काचेच्या घरात राहत नाही. त्यांनी सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका वाजवलाय मी दिवाळीनंतर बॅाम्ब फोडेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. हेही वाचा- T20 World Cup: विराटचा हट्टामुळे झाला टीम इंडियाचा पराभव! कॅप्टनच्या निर्णयांची चर्चा तर होणारच  नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन दिवाळीनंतर स्पष्ट करेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांना नवाब मलिक यांचे ड्रग्ज कनेक्शन दाखवेल, असंही फडणवीस म्हणालेत. नीरज गुंडे आरोपावरही प्रतिक्रिया मुख्यमंत्री माझ्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे यांना भेटलेत. मातोश्रीवर नीरज गुंडेवर माझ्यावर जास्त वेळा भेटले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. वाझे आम्हाला पाळायची गरज नाही असं म्हणत नीरज गुंडे हे रोज NCPचे घोटाळे समोर आणतात, असं त्यांनी सांगितलं. हेही वाचा-  देशातल्या Corona लसीकरणासंदर्भातली मोठी अपडेट, जनतेसाठी नवी मोहिम सुरु जे बाहेर आलं नाही ते मी बाहेर आणणार असल्याचं सांगत मलिकांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. नवाब मलिकांचे आरोप देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा नवाब मलिकांनी केला. जयदीप राणाचा फोटो नवाब मलिक यांनी ट्वीट केला. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा (Jaideep Rana) आहे. नदी संरक्षणासाठीचं हे गाणं होतं. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीसही आणि सुधीर मुनगंटीवार झळकले होते. याच गाण्याचा फायनान्सर हा जयदीप राणा होता, असं नवाब मलिकांनी म्हटलं. कोण आहे जयदीप राणा जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. हेही वाचा- मलिकांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांचा मोठा दावा, मागितली सुरक्षा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन सगळा ड्रग्जचे खेळे सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही नवाब मलिकांनी केला. नीरज गुंडे नामक व्यक्तीचं नाव घेत ते देवेंद्र फडणवीसांच्या काळातील 'वाझे' होते, असा आरोपही नवाब मलिकांनी केला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Nawab malik

    पुढील बातम्या