मुंबई, 01 नोव्हेंबर: माझे पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि माझ्या कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात आहे, असं मुंबई NCB झोनलचे डायरेक्टर समीर वानखेडे आणि अभिनेत्री क्रांती रेडकर- वानखेडे (Kranti Redkar-Wankhede) यांनी दावा केला आहे. तसंच तीन दिवसांपूर्वी काही लोकांनी आमच्या घराची रेकी केल्याचा दावा ही क्रांती रेडकर यांनी केला.
आमच्या घराची रेकी केल्याचं सीसीटीव्ही फुटेज आम्ही पोलिसांना देणार आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्या कुटुंबाला धोका असल्यानं आम्हाला सुरक्षा मिळणं गरजेचं असल्याची मागणी क्रांती रेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा- G20 Summit: भारताला मोठं यश, शेतकरी आणि हवामान बदलासह या मुद्द्यांकडे वेधलं लक्ष
काही दिवसांपूर्वी आमच्या घराजवळ तीन जण आले होते. त्या तिघांनी आमच्या घराची रेकी केली. या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज देखील आम्ही मिळवलं असल्याचे क्रांती रेडकर म्हणाल्या. आता ते सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
वानखेडे कुटुंबीय रामदास आठवलेंच्या भेटीला
समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandeo Wankhede) यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. यावेळी रामदास आठवलेंनी समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांना आपलं समर्थन असल्याचं सांगत नवाब मलिक हे वानखेडे कुटुंबाची बदनामी करत असल्याचं म्हटलं आहे.
रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, नवाब मलिक हे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत आहेत. वानखेडे कुटुंबीय मुस्लीम नाहीयेत. त्यांनी सर्व कागदपत्रे मला दाखवली आहेत. समीर वानखेडे यांच्यावर खोटे आरोप करण्यात येत आहेत. नवाब मलिक हे एनसीपी प्रवक्ते पदाचा गैरवापर करत आहेत. नवाब मलिक यांच्या जावयाला तरूगांत टाकले म्हणून ते हे सर्व करत आहेत असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- Diabetes सह वजन कमी करण्यासाठी 'मल्टीग्रेन आटा' आहे खूप फायदेशीर; जाणून घ्या तयार करण्याची प्रक्रिया
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCB