• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Corona Vaccination ची नवीन मोहिम सुरु, नागरिकांना मिळणार घरोघरी लस

Corona Vaccination ची नवीन मोहिम सुरु, नागरिकांना मिळणार घरोघरी लस

Corona Virus In India: देशातील कोरोना (Corona Vaccination) लसीकरणासंदर्भातली नवी अपडेट समोर आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर: देशातील कोरोना (Corona Vaccination) लसीकरणासंदर्भातली नवी अपडेट समोर आली आहे. देशात कोरोनाचा (Coronavirus) प्रार्दुभाव कमी करण्यासाठी कोरोना विरुद्ध लसीकरण (Corona Vaccine) मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत देशात कोरोना लसीचे 106 कोटींहून अधिक डोस देण्यात आलेत. आता या मोहिमेला गती देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार राज्यांच्या मदतीनं 'हर घर दस्तक' अभियान राबवणार आहे. या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मोहिमे अंतर्गत वैद्यकीय पथक घरोघरी जाऊन लोकांना लस देणार आहे. या मोहिमेंतर्गत, ज्यांनी अद्याप कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही किंवा ज्यांना दुसरा डोस मिळाला नाही, अशा लोकांना कोरोनाची लस देण्याची जबाबदारी या वैद्यकीय पथकांवर असेल. हेही वाचा-  पाच महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न, या कारणामुळे पत्नीच्या भावानं डोक्यात घातली गोळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी नुकतंच सांगितलं होतं की, वाईट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोविड-19 च्या लसीकरणासाठी घरोघरी जाऊन 'हर घर दस्तक' मोहीम सुरू केली जाईल. या प्राणघातक व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी लोकांना संपूर्ण लसीकरणासाठी प्रेरित करणं हा यामागचा उद्देश आहे. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत राष्ट्रीय आढावा बैठकीदरम्यान मांडविया म्हणाले होते की, संपूर्ण लसीकरण नसलेला कोणताही जिल्हा राहू नये. मांडविया म्हणाले होते की, हर घर दस्तक मोहीम लवकरच वाईट कामगिरी करणार्‍या जिल्ह्यांमध्ये लोकांना पूर्ण लसीकरणासाठी प्रोत्साहित आणि प्रेरित करण्यासाठी सुरू करु. नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस सर्व पात्र लोकांना COVID विरोधी लसीचा पहिला डोस देण्याचे ध्येय ठेवूया. असे सुमारे 48 जिल्हे ओळखण्यात आले आहेत जेथे पात्र लाभार्थ्यांपैकी 50% पेक्षा कमी लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे. हेही वाचा-  T20 World Cup, IND vs NZ: टीम इंडियाला मोठ्या फरकानं कसं हरवलं? विल्यमसननं सांगितलं रहस्य लसीकरण मोहीमेचा आणखी वेग वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. यावेळी लसीकरणाबाबतच्या धोरणावर चर्चा करण्यात येणार आहे. पीएम मोदी अशा 40 जिल्ह्यांच्या डीएमचीही बैठक घेणार आहेत, जिथे कोरोना लसीकरणाचा वेग मंदावला आहे. यामध्ये प्रामुख्याने मणिपूर, झारखंड, नागालँड, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र या जिल्ह्यांचा समावेश होतो.
  Published by:Pooja Vichare
  First published: