जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या', रवी राणांचा गंभीर आरोप

'मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या', रवी राणांचा गंभीर आरोप

'मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या', रवी राणांचा गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांना धमक्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 मे : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांचा शिवसेनेसोबतचा (Shiv Sena) संघर्ष (clash) दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या इशाऱ्यावरुन लीलावती रुग्णालयाच्या (Lilavati Hospital) डॉक्टरांना धमक्या दिल्या जात आहेत, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांवर आता शिवसेनेकडून नेमकं काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्यांच्या या आरोपांमुळे शिवसेना आणि राणा दाम्पत्य यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडी पाहता राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यातील सुरु असलेला हा टोकाचा संघर्ष लवकर संपेल, याची शक्यता नाही. नवनीत राणा जेलमधून बाहेर पडल्यानंतर लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. त्यांचा एमआरआय करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लीलावती रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं होतं. पण त्यांच्या याच कारवाईवरुन रवी राणा यांनी शिवसेनेकडून डॉक्टरांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप केला आहे. रवी राणा नेमकं काय म्हणाले? “शिवसेनेचे काही लोकं मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुन लीलावती रुग्णालात गेले. डॉक्टरांबद्दल आमच्या मनात देवदूत अशी भावना आहे. त्यांनी कोरोना संकट काळात अनेकांचे जीव वाचवले. अशा डॉक्टरांसोबत शिवसैनिक जे बोलले, त्यांनी डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. एमआरआयचे फोटो बाहेर कसे गेले? नवनीत राणा रुग्णालयात दाखल कशा झाल्या, काय इलाज केला? असे प्रश्न डॉक्टरांना विचारले”, असं रवी राणा म्हणाले. ( मुख्यमंत्र्यांच्या सभेचा दुसरा जबरदस्त टीझर जारी, शिवसेनेची जोरदार तयारी; Watch Video ) “ज्या महिलेवर तुम्ही हनुमान चालीसा वाचली म्हणून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला, जेलमध्ये टाकलं. त्यानंतर आता तुम्ही रुग्णालयातही अरेरावी केली. पण हेच डॉक्टर अनेकांचा जीव वाचलता, न्याय देतात. रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांना तुम्ही नोटीस देता. मुख्यमंत्र्यांमध्ये सत्तेचा अहंकार आला आहे. तो अहंकार महाराष्ट्राची जनता मोडून काढेल हे लक्षात ठेवा”, असा घणाघात रवी राणा यांनी केला. नवनीत राणांच्या उपचारावर शिवसेनेचा आक्षेप नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावरुन शिवसेनेनं आक्षेप घेतला आहे. MRIचे यंत्र अत्यंत संवेदनशील असल्यानं त्या खोलीमध्ये कुणालाही कॅमेरे किंवा मोबाईलचा वापर करता येत नाही. असं असतानाही राणांच्या उपचारांची शुटिंग कशी काय झाली, असा सवाल शिवसेनेनं लिलावती रुग्णालय प्रशासनाला केला आहे. शिवसेनेनं व्हायरल झालेल्या फोटोंवरून आक्षेप घेतला आहे. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar), शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) , शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात गेले. नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला. नवनीत राणा यांना सातत्याने जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या किशोरी पेडणेकर यांनी लिलावतींमधील राणांच्या व्हायरल फोटोवरून रुग्णालय प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. ( येत्या दोन महिन्यात राज्यात Corona ची चौथी लाट?, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं विधान ) नवनीत राणांविरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेने रुग्णालय प्रशासनास धारेवर धरलं आहे. त्यांच्या उपचारांविषयी रुग्णालय प्रशासनाला प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. नवनीत राणा यांचा एमआरआय करतानाचा फोटो यावेळी मनीषा कायंदे यांनी लिलावती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना दाखवला. एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याला परवानगी नसताना त्यादिवशी रुमपर्यंत कॅमेरा गेलाच कसा, असा सवाल पेडणेकर आणि कायंदे यांनी लिलावतीच्या अधिकाऱ्यांना केला आहे. तो फोटो कुणी काढला, याबाबतही खुलासा करावा, असंही म्हटलं आहे. स्पॉंडिलायटीस असताना नवनीत यांनी उशी कशी वापरली? नवनीत राणा यांनी स्पाँडिलायटीस असल्याचं सांगितलं होतं. हा त्रास असताना रुग्ण उशी वापरू शकत नाही. मात्र, राणांच्या व्हायरल फोटोमध्ये त्या उशी वापरताना दिसत आहेत. राणांना स्पाँडिलायटीस होती तर त्यांना उशी वापरायला कशी दिली, असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला. किशोरी पेडणेकर यांची टीका स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय, अशी टीका ही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात