नवी दिल्ली, 10 मे : दक्षिण-पूर्व दिल्लीच्या गोविंदपुरी पोलीस ठाणे (Govindpuri Police Station) परिसरात राहणाऱ्या व्यक्तीची त्याच्या मेहुण्याने हत्या (Brother in law killed person) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहजाद आलम असे मृताचे नाव आहे. त्याचे वय 40 इतके होते. तो बिहारच्या किशनगंज येथील रहिवासी होता. तर आरोपी हा मृताच्या दुसऱ्या बायकोचा भाऊ आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी जवळपास दोन वाजेच्या सुमारास पोलिसांना सूचना मिळाली होती की, शहजाद आलम नावाच्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. मात्र, रुग्णालयात त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यानतंर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांना तपासादरम्यान माहित झाले की, त्याच्या मेहुण्यानेच त्याच्यावर चाकूने हल्ला केला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. दुसरी पत्नी गेली बॉयफ्रेंडसोबत राहायला… मृत व्यक्ती किशनगंज येथील रहिवासी होता. त्याचे लग्न नजमा नावाच्या महिलेसोबत झाले होते. ती किशनगंज येथे आपल्या माहेरी राहत होती. तिला सहा मुले आहेत. तर मृत हा फरीदाबाद येथील गारमेंट फॅक्टरीमध्ये काम करायचा. यासोबतच त्याने इथे एका दुसऱ्या महिलेसोबतही लग्न केले होते. त्या महिलेपासून त्या दोघांना एक मुलगाही आहे. तर तेच दुसरीकडे त्याची दुसरी बायको मागील सहा महिन्यांपासून आपल्या बॉयफ्रेंडसोबत राहायला लागली होती. यानंतर मृत शहजाद आलम हा आपल्या दुसऱ्या पत्नीच्या बहिणीसोबत राहू लागला होता. हे वाचा - रात्री अडीच वाजचा हॉटेलच्या खोलीत घेऊन गेला, पण…; न्यूनगंडातून महिलेची गळा दाबून हत्या
याचा राग आल्याने दुसऱ्या पत्नीच्या भावाने आपल्या भावोजीची म्हणजे शहजाद आलम याची चाकूने वार करून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील दक्षिण पूर्व जिल्ह्यातील गोविंदपुरी पोलीस ठाण्यात हत्येसह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापे टाकत आहेत.