जालना, 08 ऑगस्ट : महाराष्ट्र कसाबसा कोरोनाच्या (COVID-19) लाटेतून सावरला आहे. पण, आता डेल्टा व्हेरियंट प्लस नावाचे नवे संकट राज्यासमोर उभे ठाकले आहे. नाशिकपाठोपाठ मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि औरंगाबादेत डेल्टा प्लस व्हेरियंटचे (Delta Variant) रुग्ण आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( rajesh tope) यांनी दिली. एकूण रुग्ण संख्या ही 45 वर पोहोचली आहे.
राज्यात डेल्टा आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून मराठववड्यातील बीड आणि औरंगाबाद येथे देखील त्याचे 1-1 रुग्ण आढळल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी जालन्यात News 18 लोकमतशी बोलताना दिली.
उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नका, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर निशाणा
मात्र, रुग्ण वाढत असले तरी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज असल्याने डेल्टा आणि डेल्टा प्लसला नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही, असं आवाहन देखील टोपेंनी केलं.
तसंच, डेल्टा प्लस रूग्ण संख्या वाढत आहे. मुंबई ठाणे रत्नागिरी, औरंगाबाद येथे रुग्ण वाढ दिसते. डेल्टा प्लस रुग्ण वाढ झाली तरी घाबरण्याचे कारण नाही, पण जिथे रुग्ण वाढतात तिथे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असंही टोपे म्हणाले.
IND vs ENG : 'हे तर लाजिरवाणं', पहिल्या टेस्टनंतर विराट कोहली भडकला
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच, नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅपल्स तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे. सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.
काय आहे डेल्टा प्लस कोरोना?
डेल्टा प्लस हा डेल्टा किंवा ‘बी1.617.2’ याचंच रौद्र रुप आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतातच आढळला होता आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हाच जबाबदार होता. व्हायरसच्या या नव्या प्रकारामुळे कोरोना किती घातक होऊ शकतो, याचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही. भारतात नुकतंच मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल उपचार पद्धतीला परवानगी मिळाली आहे. मात्र, ही पद्धतचही डेल्टा प्लसपुढे निष्प्रभ ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.
दिल्लीतील सीएसआयआर- इन्स्टिट्युट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) शास्रज्ञ विनोद स्कारिया यांनी रविवारी याबद्दल ट्विट केलं होतं. त्यांनी लिहिलं होतं,‘ हे म्युटेशन स्पाईक प्रोटीन SARS-CoV-2 मध्ये म्युटेशन झाल्यामुळे माणसाच्या शरीरातील पेशींमध्ये तो प्रवेश करू शकतो. सध्या भारतात K417N ची व्हेरिएंट फ्रीक्वेन्सी फार नाही. हे सिक्वेन्सेस प्रामुख्याने युरोप, आशिया आणि अमेरिकामध्ये सापडले आहेत.’ या वर्षी मार्चमध्ये पहिला सिक्वेन्स युरोपमध्ये सापडला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.