नॉटिंघम, 8 ऑगस्ट : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली. टीम इंडियाला अखेरच्या दिवशी विजयासाठी 157 रनची गरज होती, पण पावसामुळे एकही बॉल पडू शकला नाही. याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही पावसामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. पावसामुळे मॅच ड्रॉ झाल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, हे खूप लाजिरवाणं असल्याचं विराट म्हणाला.
'तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पावसाचा अंदाज होता, पण पाचव्या दिवशी पाऊस कोसळला. खेळायला आणि खेळ बघायला आम्हाला मजा आली असती, पण हे लाजिरवाणं आहे. आम्हाला मजबूत सुरुवात करायची होती आणि आम्ही ती केली. पाचव्या दिवशी आम्हाला संधी होती. आम्ही मॅचमध्ये पुढे होतो. ती आघाडी मिळवणं महत्त्वाचं होतं, पण आम्हाला पाचवा दिवस संपवता आला नाही, हे लाजिरवाणं होतं,' अशी प्रतिक्रिया विराटने मॅच संपल्यानंतर दिली.
'चौथ्या दिवशी 50 रनचा टप्पा ओलांडणं महत्त्वाचं होतं. आम्ही सामना वाचवण्यासाठी खेळत नव्हतो. आम्ही जिगरबाज खेळ केल्यामुळे सामन्यात आघाडीवर होतो. मागचे तीन आठवडे आमच्या बॉलर्सनी बॅटिंगवर मेहनत घेतली आहे. आम्ही 40 रनच्या आसपासच्या आघाडीबाबत बोलत होतो, पण आम्ही 95 रन पुढे गेलो,' असं वक्तव्य विराटने केलं.
उरलेल्या टेस्ट सीरिजमध्येही आपण अशीच टीम घेऊन खेळणार असल्याचे संकेत विराट कोहलीने दिले. वातावरण आणि खेळपट्टी बघून टीम निवड केली जाईल, पण टीम अशाच प्रकारची असेल, असं विराटने स्पष्ट केलं.
भारत आण इंग्लंड यांच्यातले सामने कायमच ब्लॉकबस्टर असतात. पुढच्या टेस्टमध्येही अशीच स्पर्धा बघायला मिळेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला. 5 टेस्ट मॅचच्या या सीरिजची दुसरी मॅच आता गुरुवारपासून लॉर्ड्सवर सुरू होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India vs england, Virat kohli