राजधानीत कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबई रेल्वे व विमान सेवा बंद होणार का? काय आहे सत्य

राजधानीत कोरोनाचा कहर! दिल्ली-मुंबई रेल्वे व विमान सेवा बंद होणार का? काय आहे सत्य

देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. दिवाळीनंतर तर कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 नोव्हेंबर: देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा (Coronavirus) कहर कायम आहे. दिवाळीनंतर तर कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा (Delhi-Mumbai Rail Service) आणि विमान सेवा (Delhi to Mumbai aircraft) बंद करू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत विचार करत आहे.

सूत्रांचा हवाला देत काही वृत्तवाहिन्यांनी 'दिल्ली-मुंबई रेल्वे सेवा आणि विमान सेवा बंद होणार' या मथळ्याखाली वृत प्रकाशित केलं. मात्र, या वृत्तात काहीही तथ्य नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा.......तोपर्यंत जगातले 4 अब्ज लोक स्थूल होणार, धक्कादायक अहवाल समोर

दिल्लीत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिल्लीतून महाराष्ट्र येणारी रेल्वे अणि विमानसेवा काही काळ बंद करावी का? असा विचार सुरू आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली. या बाबत कोणाताही पत्र व्यवहार दिल्ली केंद्र सरकारसोबत केलेला नाही, असं मुख्य सचिवांनी माहिती दिली आहे.

दुसरीकडे, विमानन मंत्रालयायाकडूनही याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. दिल्ली-मुंबई विमानसेवा बंद करण्याबाबत आतापर्यंत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयानंही रेल्वे सेवा बंद करण्याबाबत निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दिल्लीत कोरोना व्हायरसचा (Coronavirus) कहर झपाट्यानं वाढत आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 7,546 कोरोनाबाधित नवे रुग्ण (New Corona Case) आढळले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या 5,10,630 झाली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत एकट्या दिल्ली कोरोनानं 98 जणांचा बळी घेतला आहे. एकूण मृतांची संख्या 8000 वर पोहोचली आहे. तर 6658 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

भारतात पहिल्यांदाच मंत्र्यानं घेतली CORONA VACCINE

दरम्यान, मेड इन इंडिया कोरोना लस (Coronavirus vaccine) कोवॅक्सिन (Covaxin) क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. आतापर्यंत सुरुवातीच्या दोन टप्प्यातील ट्रायलमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. मात्र आता पहिल्यांदाच कोरोना लशीच्या ट्रायलमध्ये भारतातील मंत्रीही सहभागी झाले आहेत. देशात पहिल्यांदाच मंत्र्यानं कोरोनाची लस घेतली आहे.

हेही वाचा...सीरमची लस कधी उपलब्ध होणार? पूनवाला यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज (Anil vij) यांनी कोरोनाची लस घेतली आहे. हरियाणामध्ये आजपासून कोवॅक्सिन लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू झालं. आरोग्यमंत्री विजदेखील या ट्रायलमध्ये सहभागी झाले. राज्यात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये लशीचा पहिला डोस त्यांनी घेतला आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: November 20, 2020, 3:14 PM IST

ताज्या बातम्या