मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Deglur Assembly bypolls result: देगलूर विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41917 मतांनी विजयी

Deglur Assembly bypolls result: देगलूर विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41917 मतांनी विजयी

Deglur Assembly bypolls result: देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Deglur Assembly bypolls result: देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Deglur Assembly bypolls result: देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

नांदेड, 2 नोव्हेंबर : नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी (Deglur Assembly election bypolls counting) पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबाबत उत्सुकता लागली होती. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी आघाडी घेतली होती. जितेश अंतापूरकर यांनी 41933 मतांनी विजय मिळवला आहे.

30वी आणि शेवटची फेरी 

जितेश अंतापूरकर - 108840 मते

सुभाष साबणे - 66907 मते

41933 मतांनी जितेश अंतापूरकर विजयी

29व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 107329 मते

सुभाष साबणे - 65772 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 41557 मतांनी आघाडीवर

28व्या फेरीनंतर

जितेश अंतापूरकर - 104373 मते

सुभाष साबणे - 63414 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 40959 मतांनी आघाडीवर

27व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 100773 मते

सुभाष साबणे - 61354 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 39419 मतांनी आघाडीवर

26 व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 97157 मते

सुभाष साबणे - 59031 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 38126 मतांनी आघाडीवर

25व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 94221 मते

सुभाष साबणे - 56959 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 37262 मतांनी आघाडीवर

24व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 90421 मते

सुभाष साबणे - 54626 मते

उत्तम इंगोले - 10201 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 35795 मतांनी आघाडीवर

23व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 86850 मते

सुभाष साबणे - 52425 मते

उत्तम इंगोले - 9841 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 34425 मतांनी आघाडीवर

22व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 82690 मते

सुभाष साबणे - 50518 मते

उत्तम इंगोले - 9191 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 32172 मतांनी आघाडीवर

21व्या फेरीअखेरीस

जितेश अंतापूरकर - 78923 मते

सुभाष साबणे - 48657 मते

उत्तम इंगोले - 8856 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 30266 मतांनी आघाडीवर

20व्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 74821 मते

सुभाष साबणे - 47058 मते

उत्तम इंगोले - 8019 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 27763 मतांनी आघाडीवर

19वी फेरी

जितेश अंतापूरकर - 70675 मते

सुभाष साबणे - 45452 मते

उत्तम इंगोले - 7668 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 25223 मतांनी आघाडीवर

अठरावी फेरी

जितेश अंतापूरकर - 66979 मते

सुभाष साबणे - 43101 मते

उत्तम इंगोले - 7372 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 23878 मतांनी आघाडीवर

सतराव्या फेरी नंतर 

जितेश अंतापूरकर - 63537 मते

सुभाष साबणे - 40835 मते

उत्तम इंगोले - 6953 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 22702 मतांनी आघाडीवर

सोळावी फेरी 

जितेश अंतापूरकर - 60116 मते

सुभाष साबणे - 39034 मते

उत्तम इंगोले - 6388 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 21082 मतांनी आघाडीवर

पंधरावी फेरी 

जितेश अंतापूरकर - 56409 मते

सुभाष साबणे - 37229 मते

उत्तम इंगोले - 5794 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 19180 मतांनी आघाडीवर

तेराव्या फेरी अखेरीस 

जितेश अंतापूरकर - 52599 मते

सुभाष साबणे - 34857 मते

उत्तम इंगोले - 5059 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 17742 मतांनी आघाडीवर

बारावी फेरी

जितेश अंतापूरकर - 44344 मते

सुभाष साबणे - 30169 मते

उत्तम इंगोले - 4464 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 14175 मतांनी आघाडीवर

अकरावी फेरी

जितेश अंतापूरकर - 40523 मते

सुभाष साबणे - 27943 मते

उत्तम इंगोले - 4047 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 12580 मतांनी आघाडीवर

दहाव्या फेरीनंतर 

जितेश अंतापूरकर - 36592 मते

सुभाष साबणे - 25623 मते

उत्तम इंगोले - 3560 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 10969 मतांनी आघाडीवर

नवव्या फेरीअखेरीस 

महावी - जितेश अंतापूरकर - 33068

भाजप- सुभाष साबणे - 22486

वंचित- उत्तम इंगोले - 3022

कॉंग्रेसचे जितेश अंतापूरकर 10582 मतांनी आघाडीवर

आठव्या फेरीअखेरीस

जितेश अंतापूरकर - 29375 मते

सुभाष साबणे - 19873 मते

उत्तम इंगोले - 2668 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 9502 मतांनी आघाडीवर

सातव्या फेरीअखेरीस 

जितेश अंतापूरकर - 25376 मते

सुभाष साबणे - 17164 मते

उत्तम इंगोले - 2257 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 8212 मतांनी आघाडीवर

सहाव्या फेरीअखेरीस

जितेश अंतापूरकर - 22332 मते

सुभाष साबणे - 14564 मते

उत्तम इंगोले - 1840 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 7768 मतांनी आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर 

जितेश अंतापूरकर - 18245 मते

सुभाष साबणे - 12077 मते

उत्तम इंगोले - 1505 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 6168 मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरीअखेर 

जितेश अंतापूरकर - 14544

सुभाष साबणे - 9975

उत्तम इंगोले - 1225

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 4557 मतांनी आघाडीवर

तिसरी फेरी 

तिसऱ्या फेरी अखेर काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना 10712 मते, तर भाजपच्या सुभाष साबणे यांना 7448 मते

जितेश अंतापूरकर - 10712 मते

सुभाष साबणे - 7448 मते

उत्तम इंगोले - 873 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 3264 मतांनी आघाडी

दुसरी फेरी

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 7295 मते

भाजपचे सुभाष साबणे - 5001 मते

वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 769 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर 2293 मतांनी आघाडीवर

पहिल्या फेरी अखेर

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 4216 मते

भाजपचे सुभाष साबणे - 2592 मते

वंचित बहुजन आघाडीचे उत्तम इंगोले - 320 मते

काँग्रेसचे जितेश अंतापूरकर - 1624 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे नेते दिवंगत रावसाहेब अंतापुरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य लढत जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) आणि सुभाष साबणे (Subhash Sabane) यांच्यात होत आहे. ही निवडणूक काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. तर भाजपाने देखील ही जागा जिंकण्यासाठी जोर लावला आहे.

या निवडणुकीत 64.95 % इतकं मतदान झालं होतं. एकूण 2 लाख 98 हजार 535 मतदारांपैकी 1 लाख 90 हजार 800 इतकं मतदान झालं. एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशीच लढत झाली. वंचित आघाडीने देखील आपला उमेदवार दिला होता. वंचितला किती मत मिळतात यावर देखील जय पराभव अवलंबून आहे.

सुभाष साबणे यांचा अल्प परिचय

सुभाष साबणे हे शिवसेनेचे नेते. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा विधानसभा निवडणूक जिंकली आहे. सुभाष साबणे हे मुखेड विधानसभा मतदारसंघातील आमदार होते. त्यानंतर त्यांनी देगलूर येथून विधानसभा निवडणूक जिंकली. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या रावसाहेब अंतापूरकर यांनी सुभाष साबणे यांना पराभूत केलं.

वाचा : 'पैसा घ्या भाजपचा पण मत द्या महाविकास आघाडीला' जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या नेत्याचा मतदारांना सल्ला

काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती. आता या जागेवर पोटनिवडणूक पार पडली आहे. काँग्रेसने ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत मैदानात उतरले होते. तर तिकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुद्धा या जागेवर विजय मिळवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मविआ सरकारला झटका दिल्यानंतर आता देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पुन्हा भाजप बाजी मारतं की काँग्रेस आपली जागा राखतं हे पाहवं लागेल.

देगलूर बिलोली मतदारसंघात कोणाचं प्राबल्य?

2009 च्या निवडणुकीत काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर विजयी

2014 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष साबणे यांनी मारली बाजी

2019 मध्ये पुन्हा रावसाहेब अंतापूरकर यांनी विजय मिळवला

नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर ही जागा मिळवण्यासाठी भाजपनेही कंबर कसली.

First published:

Tags: Assembly Election 2021, BJP, Nanded, काँग्रेस