मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबतच्या मतभेदांवर तोडगा; शिंदे-शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबतच्या मतभेदांवर तोडगा; शिंदे-शाहांच्या बैठकीत काय ठरलं?

रात्री उशिरा अमित शाह यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम होते, तर भाजपने 60-40 च्या फॉर्म्युल्यावर भर दिला आहे. अखेर या बैठकीत या मतभेदांवर तोडगा निघाला. (Cabinet Expansion)

नवी दिल्ली 31 जुलै : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना झाला. मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अखेर दिल्लीत झाली शिंदे-शहांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडला?

रात्री उशिरा अमित शाह यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे 50-50 फॉर्म्युल्यावर ठाम होते, तर भाजपने 60-40 च्या फॉर्म्युल्यावर भर दिला आहे. अखेर या बैठकीत या मतभेदांवर तोडगा निघाला. तसंच महत्त्वाच्या मंत्रालयांवरील चर्चेला अंतिम स्वरूप दिलं गेलं. येत्या दोन-तीन दिवसांत राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून तातडीने रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती पुढे आलेली आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर विस्ताराने दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार पुढील दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगण्यात येत आहे.

'तरीही शिवसेना सोडणार नाही' ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया

सोमवारी 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोर्टाचा काय निर्णय लागतो, त्यानुसार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. शाह आणि शिंदे यांच्या दिल्लीतील बैठकीत यावरही चर्चा झाली. आगामी सुप्रीम कोर्टाच्या प्रकरणात सरकार काय निर्णय घेणार यावरही कायदेतज्ज्ञांशी बैठकीत चर्चा झाली.

First published:
top videos

    Tags: Amit Shah, Eknath Shinde