मराठी बातम्या /बातम्या /देश /

अखेर दिल्लीत झाली शिंदे-शहांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडला?

अखेर दिल्लीत झाली शिंदे-शहांची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त सापडला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून तातडीने रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

  • Published by:  sachin Salve

नवी दिल्ली, 31 जुलै : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर 1 महिन्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेला मुहुर्त मिळाला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांची भेट झाली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून 1 ते 2 दिवसात विस्तार होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादहून तातडीने रात्रीच दिल्लीला रवाना झाले होते. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असल्याची माहिती पुढे आलेली आहे. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर विस्ताराने दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार पुढील दोन-तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी महिन्याभरातून पाचव्यांदा दिल्ली गाठली. दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार होते. पण, शहा यांची भेटीचा टायमिंग न मिळाल्यामुळे शिंदे यांची दिल्लीवारी पुढे ढकलली होती. सोमवारी 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे आणि शिवसेनेच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे कोर्टाचा काय निर्णय लागतो, त्यानुसार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

(राष्ट्रकूल स्पर्धेत भारताचं 'वजन', राऊतांवर गुन्हा दाखल, स्वाईन फ्लूचा विळखा TOP)

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 40 आणि अपक्ष अशा जवळपास 50 पेक्षा जास्त आमदारांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मागच्या सरकारमधले 8 मंत्रीही सहभागी होते, त्यामुळे त्यांनाही नव्या मंत्रीमंडळात आपल्याला स्थान असेल अशी अपेक्षा आहे. या मंत्रिमंडळात भाजपला 29 कॅबिनेट मंत्रीही हवी आहे. तर शिंदे गटाला 8 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्री अशी एकूण 13 मंत्रिपद हवी आहेत. शिंदे गटात आधीच शिवसेनेचे सात मंत्री आहे. शिंदे गटामध्ये 40 बंडखोर आमदार आणि 10 अपक्ष आहे, त्यामुळेच शिंदे गटाला जास्त मंत्रिपदं हवी आहेत. 6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी अट शिंदे गटाकडून घालण्यात आली असून एकूण 19 मंत्रिपद हवी अशी मागणी आहे. त्यामुळेच भाजपकडून याला होकार दिलेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तार रखडलेला आहे, अशी चर्चा आहे.

First published: