मुंबई, 5 नोव्हेंबर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात (Maharashtra Covid Update) कोरोनाबाधित रुग्ण (Covid-19) आढळून (Covid patient) संख्येतही घसरण झाली आहे. त्याचबरोबर कोरोनारुग्ण बरे होण्याचा दर (Recovery Rate) वाढला आहे तर मृत्यूदरात घट कायम आहे.
गुरुवारी (5 नोव्हेंबर) राज्यात 5 हजार 246 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर राज्यात आज 117 जणांचा कोरोनानं बळी घेतला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के एवढा आहे.
हेही वाचा..मुलांच्या खेळण्यावरून दोन गटात राडा, हाणामारीत केला अॅसिड हल्ला, 6 होरपळले
गेल्या 24 तासांत 11 हजार 277 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण 15 लाख 51 हजार 282 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.07 टक्के एवढा झाला आहे.
सध्या राज्यात 12 लाख 52,778 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 12 हजार 003 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1 लाख 6 हजार 519 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 92 लाख 50 हजार 254 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 3 हजार 444 (18.42 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, मुंबई आणि पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. कोरोनाचा आलेख घसरत असला हे दिलासादायक असलं तरी बिनधास्त होऊन चालणार नाही. मास्कचा सक्तीने वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या 3 गोष्टींचं कटाक्षाने पालन केलं तर कोरोना दूर राहू शकतो. यात हलगर्जीपणा झाला तर दुसरी लाट येऊ शकते, असा इशाराही तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.
दिवाळीत कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने सांगितले 5 नियम
राज्यात कोरोनाचा आलेख (Maharashtra Coronavirus) खाली येत असतानाच राज्य शासनाची चिंता दिवाळीमुळे (Diwali) वाढली आहे. या काळात लोकांची गर्दी वाढेल आणि एकत्र येणंही वाढेल त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
थंडी वाढल्याने दुसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना काळात दिवाळी असल्याने त्याविषयी राज्य सरकारने सुरक्षा नियमावली जाहीर केली आहे. सगळ्यांनी त्याचं पालन करावं असं आवाहनही सरकारने केलं आहे.
राज्य सरकारने दिवाळीसाठी जारी केल्या 5 मार्गदर्शक सूचना...
-दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
-दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
-सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा
-धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.
हेही वाचा...यंदाची दिवाळी फटाक्याविना? मुंबईकरांसाठी BMC लवकरच घेणार मोठा निर्णय
दरम्यान, कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाकेमुक्त असावी असा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात आधीच प्रदुषणात वाढ होते. त्यात फटाक्यामुळे जास्त प्रदुषण होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच दुसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केल्याने राज्य सरकार सावध झालं आहे.