लखनऊ, 08 मे : उत्तर प्रदेशात एका अपघातात 45 वर्षीय कामगारासह त्याच्या पत्नीचा मृत्यू झाला. दाम्पत्य त्यांच्या दोन चिमुकल्यांसह सायकलवरून छत्तीसगढला निघाले होते. रस्त्यात एका अज्ञात वाहनानं सायकलला जोराची धडक मारली. या अपघातात दाम्पत्याचा मृत्यू झाला तर दोन्ही मुलं जखमी झाली आहेत.
पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे कृष्णा साहू आणि प्रमिला साहू अशी असून त्यांच्या दोन्ही मुलांचं वय अंदाजे पाच वर्षांपेक्षा कमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली. लखनऊ बायपास रोडवरून कृष्णा साहू सायकलवरून त्याची पत्नी आणि दोन मुलांसह त्याच्या गावी जाण्यासाठी निघाला होता. रस्त्यात एका वेगवान गाडीने त्यांना धडक दिली.
अपघाताची माहिती लोकांनी पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलीस पोहचले तेव्हा तिथे कृष्णा आणि प्रमेला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सायकल एका बाजूला पडली मोडून पडली होती. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांचा जीव वाचवता आला नाही.
हे वाचा : 'रोजापेक्षा 4 वर्षांच्या दीक्षाचा जीव महत्त्वाचा', वकारने तोडला रमझानचा उपवास
कृष्णाच्या दोन्ही मुलं सुदैवानं या अपघातातून वाचली. त्यांना किरकोळ खरचटलं आहे. पोलिसांनी कृष्णा आणि त्याच्या पत्नीच्या अपघाती मृत्यूची माहिती कुटुंबियांना दिली. लॉकडाऊनच्या काळात काम नसल्यानं कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला होता.
हे वाचा : पुण्यात अडकलेल्यांना गावी पाठवण्याची प्रकिया सुरू, 38 जण नांदेडला रवाना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus