पोलीस दलात कोरोनामुळे 6वा मृत्यू, नाशिकमध्ये तैनात कॉन्स्टेबलने घेतला अखेरचा श्वास

पोलीस दलात कोरोनामुळे 6वा मृत्यू, नाशिकमध्ये तैनात कॉन्स्टेबलने घेतला अखेरचा श्वास

साहेबराव झिप्रु खरे हे नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस हेडक्वार्टरमध्ये तैनात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आज त्यांचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नाशिक, 09 मे : राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढत असताना आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात कोरोनामुळे 6व्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिप्रु खरे असं मृत्यू झालेल्या पोलिसांचं नावं आहे. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साहेबराव झिप्रु खरे हे नाशिक ग्रामीणमध्ये पोलीस हेडक्वार्टरमध्ये तैनात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि आज त्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरातील पोलीस कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. राज्यात शुक्रवारी 24 तासांत 75 पोलीस कोरोनाबाधित झाले होते. आता कोरोनाबाधित पोलिसांची एकूण संख्या 531 झाली आहे. तर आतापर्यंत 6 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईत 3, पुण्यात 1 आणि सोलापुरात एकचा आणि नाशिकमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये हत्येचा थरार, तलवारी आणि बंदुकीनं एका क्षणात पाडले 5 मृतदेह

मुंबईत 233 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आहेत. त्यात सकारात्मक बाब म्हणजे 39 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 531 वर पोहोचली आहे. यामध्ये 51 अधिकारी आणि 480 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

LIVE VIDEO: चॉपर दाखवून पळत सुटला, नंतर केले वार; मुंबईत 3 पोलीस जखमी

कोरोनाच्या संकटात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह पोलिसही दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. मात्र हेच पोलीस आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. 51 अधिकारी आणि 480 कर्मचारी अशा एकूण 580 पोलिसांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे, एकूण 39 रुण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने आतापर्यंत सहा पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

साहेब, कुठून आली एवढी माणुसकी! काळजात घर करेल या फोटोमागची कहाणी

First published: May 9, 2020, 7:33 PM IST

ताज्या बातम्या