LIVE VIDEO: चॉपर दाखवून पळत सुटला, नंतर केले वार; मुंबईत 3 पोलीस जखमी

LIVE VIDEO: चॉपर दाखवून पळत सुटला, नंतर केले वार; मुंबईत 3 पोलीस जखमी

या हल्ल्यामध्ये दोन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई, 09 मे : शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मरीन ड्राईव्ह इथे नाकाबंदी दरम्यान एका माथेफिरुनं मुंबई पोलिसांवर चॉपरने वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या महितीनुसार, करण प्रदीप नायर असं या माथेफिरू तरुणाचं नाव असून मलबार हिल इथल्या ब्रीच कॅंडी परिसरातील सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहतो. हा तरुण दारूच्या नशेत होता की नाही हे स्पष्ट झालं नाही पण त्याने हे कृत्य का केलं याबाबत चौकशी सुरू असून त्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा व्हिडिओ न्युज 18लोकमतच्या हाती लागला आहे.

27 वर्षीय तरुणाने चॉपरने पोलिसांवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन पोलीस अधिकारी आणि एका कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. मरीन ड्राईव्ह पोलिसांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मृत्युंजय हिरेमठ यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, ब्रीच कँडीजवळील सिल्व्हर ओक इस्टेटमध्ये राहणारा करण प्रदीप नायर याने रात्री 1.30 च्या सुमारास नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला केला. ते म्हणाले की, मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेल्या पोलिसांच्या खांद्यावर आणि हाताला दुखापत झाली आहे आणि त्यांना जेजे रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हिरेमठ म्हणाले की, "जेव्हा आमच्या पोलिसांना प्राणसुखलाल माफतलाल हिंदू स्वीमिंग बाथ अँड बोट क्लब जवळ एक व्यक्ती दिसली तेव्हा त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने हातातला चॉपर दाखवला आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बराच वेळ त्याचा पाठलाग केला. जेव्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला तेव्हा त्याने पोलिसांवर हल्ला केला.

आर्किटेक्चरमध्ये पदवीधर असलेल्या नायरला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि शस्त्रास्त्र कायद्यासह आयपीसीच्या विविध कलमांखाली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते म्हणाले की, घटनेनंतर तत्काळ डीसीपी झोन 1 संग्रामसिंह निशंदर घटनास्थळी पोहोचले आणि जखमी पोलिसांना उपचारासाठी रुग्णालयात हलवलं.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 9, 2020, 4:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या