लॉकडाऊनमध्ये हत्येचा थरार, तलवारी आणि बंदुकीनं एका क्षणात पाडले 5 मृतदेह

लॉकडाऊनमध्ये हत्येचा थरार, तलवारी आणि बंदुकीनं एका क्षणात पाडले 5 मृतदेह

दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये तब्बल 5 जणांची हत्या झाली आहे.

  • Share this:

कच्छ, (गुजरात)09 मे : कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. अशात गुन्हे होण्याचं प्रमाण काही कमी होत नाहीये. आताही हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमध्ये तब्बल 5 जणांची हत्या झाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाताच पोलीस घटनेचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे.

परस्परांतील वादामुळे दोन गटाममध्ये हाणामारी सुरू झाली. यामध्ये सगळ्यांच्या हातात धारदार शस्त्रं होती. त्यातून हल्ला झाल्यामुळे 5 तरुणांची हत्या झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा सर्व गंभीर प्रकार गुजरातच्या कच्छमधील हमीरपर इथे घटना आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोक पोहोचले आणि तात्काळ पोलिसांना प्राचारण करण्यात आलं.

3 लाख पास, 1 लाख गुन्हे आणि 87 हजार तक्रारींचे फोन; कोरोनाशी असं लढतंय राज्य

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांवर जोरजार हल्ला केल्यामुळे जागीच चार जणांचा मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या भांडणात गोळीबार झाला असल्याचीही माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस या घटनेचा कठोर तपास करत आहे.

LIVE VIDEO: चॉपर दाखवून पळत सुटला, नंतर केले वार; मुंबईत 3 पोलीस जखमी

सूत्रांनी सांगितल्यानुसार, पोलिसांनी 5 हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मृतांची ओखळ पटवण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत. तर घटनास्थळी उपस्थित स्थानिकांचीही पोलीस चौकशी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. फडणवीसांनी केला थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, पुढे काय घडलं?

संपादन - रेणुका धायबर

First published: May 9, 2020, 5:59 PM IST

ताज्या बातम्या