जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / झोका खेळताना काळजी घ्या! एक चूक आणि जळगावातील मुलाचा जागीच मृत्यू

झोका खेळताना काळजी घ्या! एक चूक आणि जळगावातील मुलाचा जागीच मृत्यू

झोका खेळताना काळजी घ्या! एक चूक आणि जळगावातील मुलाचा जागीच मृत्यू

अमळनेर शहरातील मुंदडा नगर 1 मधील 15 वर्षीय बालकाचा झोका खेळत असताना मृत्यू झाला. झोका खेळत असताना फाशी लागून या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर, जळगाव 21 नोव्हेंबर : घरात लहान मूल असेल तर पालकांना विशेष काळजी घ्यावी लागती. अनेकदा लहान मुलं खेळण्याच्या नादात असं काही करतात की त्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे घरात लहान मुलं असतील तर पालकांना त्यांच्या प्रत्येक हाचलाचीवर लक्ष द्यावं लागतं. मात्र, तरीही अनेकदा मोठ्या दुर्घटना घडतात. जळगाव मधून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. …अन् 6 महिन्यातच संसाराचा दुर्दैवी अंत; जुन्नरमध्ये पत्नीला वाचण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू अमळनेर शहरातील मुंदडा नगर 1 मधील 15 वर्षीय बालकाचा झोका खेळत असताना मृत्यू झाला. झोका खेळत असताना फाशी लागून या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वेदांत संदीप पाटील असं या बालकाचं नाव आहे. वेदांतचे आई आणि वडील दोघंही शिक्षक आहेत. शहरातील ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल इथे नववीत हा मुलगा शिकत होता. घटना घडल्यानंतर त्याला त्वरित अमळनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी वेदांतला मृत घोषित केलं. या घटनेनंतर वेदांतचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवनिच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. पुण्यात मोठी दुर्घटना, नवले ब्रिजवर तब्बल 30 गाड्या एकमेकांना धडकल्या, धक्कादायक PHOTOS! जुन्नरमध्ये पती-पत्नीचा हृदयद्रावक अंत - पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातूनही नुकतीच एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका दाम्प्त्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. या घटनेत पाण्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर येथे घडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात