मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...अन् 6 महिन्यातच संसाराचा दुर्दैवी अंत; जुन्नरमध्ये पत्नीला वाचण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू

...अन् 6 महिन्यातच संसाराचा दुर्दैवी अंत; जुन्नरमध्ये पत्नीला वाचण्याच्या प्रयत्नात पतीचाही मृत्यू

फाईल फोटो

फाईल फोटो

या घटनेत पाण्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर येथे घडली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे 21 नोव्हेंबर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेत सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या एका दाम्प्त्याचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. या घटनेत पाण्यात बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील कुकडेश्वर येथे घडली.

पुण्यात मोठी दुर्घटना, नवले ब्रिजवर तब्बल 30 गाड्या एकमेकांना धडकल्या, धक्कादायक PHOTOS!

नाजूका दिवटे ही महिला कुकडेश्वर येथील आपल्या घराजवळ असलेल्या विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. मात्र, यावेळी ती विहिरीत पडली. हे पाहताच पत्नीला वाचवण्यासाठी पती सागर बाळू दिवटे यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, त्यांना पत्नीला वाचवण्यात यश आलं नाही आणि या घटनेत दोघांचाही विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

सहा महिन्यांपूर्वीच या दोघांचं लग्न झालं होतं. सागर बाळू दिवटे आणि नाजूका सागर दिवटे हे दोघंही या अपघातात मृत झाले आहेत. घटनेनंतर काही वेळाने विहिरीच्या काठावर गाणी सुरू असलेला मोबाईल दिसला. तर विहिरीत तरंगणारी बादली दिसल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. अवघ्या सहा महिन्यातच दोघांच्याही संसाराचा असा शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

खोपोलीमध्ये बसचा भीषण अपघात, 10 प्रवासी जखमी

भंडाऱ्यात गर्भवतीचा मृत्यू -

भंडाऱ्यातूनही शुक्रवारी एक अशीच हृदयद्रावक घटना समोर आली होती. यात तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या गर्भवती महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील लेंडेझरी येथे घडली. राजकुमारी सुनिल नेवारे (30) असं मृत महिलेचं नाव असून ती नऊ महिन्याची गर्भवती होती. महिला शुक्रवारी सकाळी गावाजवळील हुटकाळा तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती. कपडे धुत असताना पाय घसरून ती खोल पाण्यात पडली. यातच गर्भवती महिलेचा मृत्यू झाला

First published:

Tags: Pune news, Shocking news