सुमित सोनवणे, दौंड, 10 मार्च: मनमाड बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर दौंड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया (Premsukh Kataria) यांच्या गाडीचा भीषण अपघात (Accident) झाला आहे. दौंडमध्ये ही अपघाताची घटना घडली. या अपघातात कटारिया यांच्या डोक्याला, तोंडाला मार लागला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने गाडीतील एअर बॅगमुळे (Airbag) प्रेमसुख कटारिया थोडक्यात बचावले आहेत. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच जवळील समादेशक कार्यालयासमोर हा अपघात झाली. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातात कटारिया थोडक्यात बचावले आहेत पण गाडीचा मात्र चक्काचूर झाला आहे. या अपघातात नऊ इंच बांधकामाची भिंत तोडून त्यांचे चारचाकी वाहन आतमध्ये घुसले. गाडीच्या पुढील भागाचा चेहरामोहराच बदलला आहे.
(हे वाचा- West Bengal Election Video: दिदींची चाय पे चर्चा, ममता बॅनर्जी बनल्या ‘चहावाली’ ) एसआरपीएफ मुख्यालयाजवळच हा अपघात झाल्याने त्याठिकाणी तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी लगोलग तिथे थाव घेतली. अपघातानंतर एअरबॅग उघडल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत. ज्याठिकाणी हा अपघात झाला तो भाग अत्यंत अरुंद आहे. कटारिया यांच्या हनुवटीजवळ टाके घालण्यात आले आहेत