जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / dasara melava : यांनी मंत्रिपद भाड्याने दिलंय, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

dasara melava : यांनी मंत्रिपद भाड्याने दिलंय, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर घणाघात

 आता काय बीड जिल्ह्याची अवस्था आहे, आहे का रुपया तरी, बजेट. माझ्याच योजना सुरू आहे, सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांचं.

आता काय बीड जिल्ह्याची अवस्था आहे, आहे का रुपया तरी, बजेट. माझ्याच योजना सुरू आहे, सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांचं.

आता काय बीड जिल्ह्याची अवस्था आहे, आहे का रुपया तरी, बजेट. माझ्याच योजना सुरू आहे, सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांचं.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 15 ऑक्टोबर :  ‘राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? हे असं आहे त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या. असं करेन अन् तसं करेन. आता काय आहे बीड जिल्ह्याची अवस्था. सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांचं. आपलं मंत्रिपद भाड्याने दिले आहे.  असं म्हणत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर घणाघाती टीका केली. (Pankaja munde dasara melava 2021) दसरा मेळाव्यानिमित्ताने सावरगावात भगवानबाबा भक्तीगडावर पंकजा मुंडे यांनी विराट दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांची चौफेर तोफ धडाडली. ‘पंकजा ताई घरात बसल्या आहेत म्हणत जे खूष आहेत त्यांनी माझा दौरा लिहून घ्या. मी 17,18,19 दिल्लीला आहे. त्यानंतर 23, 24, 25 तारखेला मुंबई, नवी मुंबई आणि पुण्याला आहे. नंतर 29, 30, 31 तारखेला नाशिकच्या दौऱ्यावर आहे. 12 डिसेंबरला उसाच्या फडात जाऊन ऊसतोड कामगारांच्यासोबत मी गावागावात जाऊन संवाद साधणार आहे’ असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कामाचा पाढाच वाचला. Bigg Boss Marathi: स्पर्धकांना मिळणार ‘नवरात्री स्पेशल’ मेजवानी;पाहा फोटो ‘कोरोना होता, लोकांना कोरोनाच्या संकटात औषध, बेड मिळत नव्हते. अशी नागरिकांची अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते का? मी दौरे करुन तुमचं आरोग्य धोक्यात टाकायचं होतं का? तुमची काळजी वाटली म्हणून घरात बसली नाही तर कोविड सेंटर सुरू केलं. कोरोना संकटात नागरिकांना बेड, औषधे उपलब्ध करुन दिली. अतिवृष्टी झाली तेव्हा दौरा केला आणि दसऱ्याच्या आधी पॅकेज जाहीर करण्याचं म्हटलं, केलं की नाही दसऱ्यापूर्वी पॅकेज जाहीर झालं आहे, असंही पंकजा म्हणाल्यात. ‘पण केवळ पॅकेज जाहीर करुन चालणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पाहिजेत. शेतकऱ्यांना मदत मिळाली का? तेवढी नरेंद्र मोदींची मदत येत आहे. राज्य सरकारची आली का मदत? पालकमंत्र्यांची मदत आली का? त्यामुळे यांना काही बोललं की राग येतो. तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला बोलणार? तुम्ही विरोधी पक्षात असताना किती लोकांना त्रास द्यायचे नुसत्या धमक्या. असं करेन अन् तसं करेन. आता काय बीड जिल्ह्याची अवस्था आहे, आहे का रुपया तरी, बजेट. माझ्याच योजना सुरू आहे, सगळंच बंद आहे, पण चालू आहे ना त्यांचं. आपलं मंत्रिपद भाड्याने दिले आहे. यांचं चालत नाही, तुम्ही चांगलं काम करा. जनतेच्या हिताचे काम करा, आम्ही जाहीर अभिनंदन करू, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. अमित शाहांच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, आळवले शांततेचे सूर ‘रोज स्त्रीयांच्या समस्या वाढल्या आहे. सोनपेठमध्ये महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या घटना वाढत आहे. महिलांकडे वाकड्या नजराने बघणाऱ्यांना पायाखाली घालण्याऱ्या अहिल्यादेवींची ही भूमी आहे. आम्ही गळ्यात मंगळसूत्र घातलं. जी माऊली तुमच्यासाठी उपास तपास करते, जी माऊली पत्नीचे कर्तृव्य पार पाडते, त्यांच्या हक्कासाठी तुम्हाला जाब विचारायचा की नाही, असा थेट सवालही पंकजा मुंडेंनी विचारला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात