वसई,06 ऑगस्ट : लॉकडाऊनमध्ये (lockdown) बंद झालेल्या बार मालकांनी (bar) अनोखी शक्कल लढवून वसईतील (vasai) एका रिसॉर्टमध्येच (Resort) डान्सबार तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विरार पोलिसांनी (virar police) याप्रकरणी चांदीप येथील मॉस नावाच्या रिसॉर्टवर (Moss Resort) गुरूवारी रात्री छापा टाकून 15 मुलींसह, ग्राहक आणि हॉटेलच्या कर्मचार्यांना अटक केली आहे. रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू करण्याची ही पहिलीच घटना आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि ठाण्यातील ऑर्केस्ट्रा बार बंद झाले आहेत. त्यामुळे डान्सबार मालकाने अनोखी शक्कल लढवत रिसॉर्टमध्येच डान्स बार सुरू केला. मुंबई, अहमदाबाद महामार्गावरील चांदीप गावाजवळ असलेल्या मॉस या रिसॉर्टमध्ये हा डान्स बार सुरू करण्यात आला होता.
खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट
गेल्या 3-4 दिवसांपासून हा रिसॉर्टमधला डान्स बार छुप्या पद्धतीने सुरू होता आणि त्यात मोठ्या प्रमाणावर ग्राहक येत होते. याची कुणकुण विरार पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी गुरूवारी रात्री सापळा लावून कारवाई केली. या कारवाईत एकूण 21 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यात 12 बारबाला, 6 ग्राहक आणि हॉटेलचा व्यवस्थापक आणि कर्मचार्यांचा समावेश आहे.
काशिमिरा येथील बॉसी नावाच्या डान्सबार मालक सचिन दांडगे याने हा बार सुरू केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अटक केलेल्या आरोपींना गुरूवारी दुपारी वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्यावर विविध कलमांसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी रिसॉर्ट मालकावरही गुन्हे दाखल केले असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. रिसॉर्टमध्ये अशाप्रकारे डान्सबार सुरू असल्याची ही पहिलीच घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.