मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट

Shocking! खुलेआम AK-47 रायफल घेऊन फिरत होती महिला; Video समोर आल्यानंतर पोलीस अलर्ट

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला आहे.

हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तिचा तपास सुरू केला आहे.

एका रायफलधारी महिलेचा व्हिडिओ (San Francisco woman with AK-47) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला हातात चक्क एके-47 रायफल नाचवत असल्याचे दिसून येत आहे.

  वॉशिंग्टन, 6 ऑगस्ट : गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेत गोळीबारांच्या घटनांमध्ये (America Shooting incidents) वाढ झाली आहे. यामुळे देशातील बंदुका बाळगण्यासंबंधीचे कायदे (America Weapons law) पुन्हा चर्चेत आले आहेत. यातच आता सॅन फ्रॅन्सिस्कोमधील एका रायफलधारी महिलेचा व्हिडिओ (San Francisco woman with AK-47) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला हातात चक्क एके-47 रायफल नाचवत असल्याचे दिसून येत आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  बार्नवेल्ड आणि मॅककिनोन अव्हेन्यू भागातील रस्त्यांवर ही महिला कारमधून फिरत होती. यावेळी कारच्या खिडकीमधून अर्धं बाहेर येत ती हातात एके-47 (US woman with AK-47) रायफल नाचवत होती. 11 जुलैला झालेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड (US woman with rifle CCTV) झाला होता. मात्र, ट्रॅफिक पोलिसांनी बुधवारी या महिलेचा फोटो प्रसिद्ध केला. पोलिसांनी या महिलेची कार जप्त केली आहे. पण, तिच्याबद्दल कोणतीही माहिती देण्याचे त्यांनी टाळले, असं डेली मेलने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे.

  सॅन फ्रॅन्सिस्कोचे पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर ॲडम लॉब्सिंगर यांनी सांगितले, की या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. या महिलेकडील बंदूक खरी होती की नव्हती याबाबत स्पष्टता नाही. पण, ही खरी बंदूक असल्यास तिच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ॲडम यांनी स्पष्ट केले.

  हे ही वाचा-बारमध्ये महिलांनी एकमेकींना किस करताच भयंकर शिक्षा; बाऊन्सरने जमिनीवर आपटलं

  कॅलिफोर्नियातील नियमांनुसार (California state gun laws) असॉल्ट वेपन (Assault weapon) जवळ बाळगणे गुन्हा आहे. त्यामुळे या महिलेकडील एके-47 (Woman with AK-47) खरी असल्यास तिला तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोळीबारांच्या घटनांमध्ये (San Francisco Shootings) वाढ झाली आहे. या वर्षीच्या जूनपर्यंतच शहरात अशा 119 घटनांची नोंद झाली आहे. आधीच गोळीबारांच्या घटनांमुळे लोक भयभीत झालेले असतानाच आता या महिलेचा प्रताप समोर आला आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोच्या पोलीस विभागात सुमारे 400 पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आवर घालण्यास पोलीस खात्याला अडचण येत आहे.

  केवळ सॅनफ्रॅन्सिस्कोच नाही, तर अमेरिकेच्या इतर शहरांमध्येही गोळीबाराच्या घटनांचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षी शिकागो, लॉस एंजेलिस, मिनियापोलिस, पोर्टलँड, ऑरेगॉन, बाल्टीमोर, बॅटनरूज, लुइझियाना आणि ह्युस्टन अशा शहरांमध्ये गोळीबाराच्या बऱ्याच घटना समोर आल्या होत्या. अमेरिकेत शाळांमध्येही (America School Shootings) अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. बंदुका बाळगण्यासंबंधी कायदे आवश्यक तेवढे कडक नसल्यामुळे शाळकरी मुलांचा आणि शिक्षकांचाही जीव धोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच नागरिकांकडून बंदुकांबाबतचे कायदे (America Gun Laws) कडक करावे अशी मागणी वाढत आहे.

  First published:
  top videos

   Tags: America, Cctv footage, Crime news