वांद्रे स्टेशनवर तोबा गर्दी! कोरोना टेस्ट न करता मुंबईत पोहोचले 780 प्रवाशी, पाहा VIDEO

रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली

रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली

  • Share this:
    मुंबई, 25 नोव्हेंबर: दिल्ली (Delhi) पाठोपाठ मुंबईतही (Mumbai) कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक होण्याची भीती वर्तवली जात आहे. राज्यात कोरोनाचा धोका वाढू नये यासाठी राज्य सरकारनं (Maharashtra Government) ठोस पाऊलं उचलली आहेत.  परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबतचे काही नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. मात्र, वांद्रे रेल्वे स्टेशनवरील (Bandra Railway Station) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विना कोरोना टेस्ट (Without Corona Test) केलेले 780 प्रवाशी मुंबईत पोहोचले आहेत. भूज आणि सूर्यनगरी एक्स्प्रेसचं काही मिनिटांच्या अंतरानं वांद्रे स्टेशनवर आगमन झालं. दोन्ही रेल्वे गाड्या एकाच वेळी स्टेशनवर पोहोचल्यानं स्टेशनवर प्रवाशांची तोबा गर्दी झाली. एकूण 780 प्रवाशांचा स्टेशनवर गर्दी झाली. हेही वाचा..6 वर्षाय चिमुरड्यानं बघितले अनैतिक संबंध, बदनामी होईल म्हणून तरुणानं काढला काटा धक्कादायक म्हणजे 780 प्रवाशी विना कोरोना टेस्ट मुंबईत दाखल झाले आहेत. रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. पण सरसकट सगळ्याच प्रवाशांचे अँटीजन करणंही घातक ठरू शकतं. मात्र, 30 मिनिटांत जीआरपी आणि आरपीएफच्या मदतीनं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. वांद्रे रेल्वे स्टेशनवरील गर्दीचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांचे रेल्वे स्टेशनवर स्क्रिनिंग करण्यात येत आहे. मुंबईतील मोठ्या रेल्वे स्टेशनवर रॅपिड अँटीजेन टेस्टिंग बुधवारपासून सुरू करण्यात आलं आहे. दादर स्टेशनवर ही चाचणी सुरू केली गेली आहे. परराज्यात येण्याऱ्या प्रवाशांना 72 तास आधी कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोरिवली, अंधेरी, वांद्रे टर्मिनस, दादर, मुंबई सेंट्रल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी आणि कुर्ला) अशा मुख्य स्थानकांवर सतर्क रहाण्याची सूचना केली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात परराज्यातून प्रवासी दाखल होतात. हेही वाचा.. 1 डिसेंबरपासून रेल्वेसेवा थांबणार? पाहा काय आहे Viral Message चे सत्य चाचणी निगेटिव्ह असेल तर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल. महाराष्ट्रात दाखल झालेल्या ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील, अशी माहिती मिळाली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: