• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • 1 डिसेंबरपासून रेल्वेसेवा थांबणार? पाहा काय आहे Viral Message चे सत्य

1 डिसेंबरपासून रेल्वेसेवा थांबणार? पाहा काय आहे Viral Message चे सत्य

1 डिसेंबरपासून देशभरातली रेल्वेसेवा (Indian Railway) थांबवण्यात येणार असल्याचा व्हॉट्सऍप (WhatsApp) मेसेज व्हायरल होत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : 1 डिसेंबरपासून देशभरातली रेल्वेसेवा (Indian Railway) थांबवण्यात येणार असल्याचा व्हॉट्सऍप (WhatsApp) मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या कोविड-19 (Covid-19) स्पेशल ट्रेनही बंद करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण व्हायरल होत असलेला हा मेसेज खोटा असल्याचं समोर आलं आहे. हा मेसेज मोठ्याप्रमाणावर व्हायरल झाल्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला होता. प्रेस इनफॉरमेशन ब्युरोच्या सत्यता पडताळणीमध्ये हे वृत्त चुकीचं असल्याचं समोर आलं आहे. रेल्वे मंत्रालयाने रेल्वेसेवा खंडीत करण्याचा असा कोणताही निर्णय घेतल्याचं प्रेस इनफॉरमेशन ब्युरोने स्पष्ट केलं आहे. 'कोविड-19 स्पेशल ट्रेनसह अन्य रेल्वेसेवा 1 डिसेंबरपासून बंद होणार असल्याचा व्हॉट्सऍप मेसेज फिरत आहे. पण पीआयबीने केलेल्या पडताळणीनुसार हा मेसेज खोटा आहे. रेल्वे मंत्रालयाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही', असं ट्विट पीआयबीने केलं आहे. कोरोना व्हायरस (Corona Virus)च्या प्रसारापासूनच देशभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या गेल्या आहेत. मार्च महिन्यामध्ये केंद्र सरकारने प्रवाशांसाठी रेल्वेसेवा बंद केली होती. जून महिन्यामध्ये ही रेल्वेसेवा ठराविक प्रमाणात सुरू करण्यात आली. कोरोना प्रोटोकॉल्सनुसार सध्या भारतीय रेल्वे ठराविक रेल्वे चालवत आहे. नागरिकांनी चुकीच्या आणि खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असं सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. डिसेंबर 2019 साली पीआयबीने अशा खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी सत्यता पडताळणीला सुरुवात केली. तसंच खोट्या आणि संशयास्पद बातम्यांबाबत तक्रार करण्याचं आव्हानही सरकारकडून करण्यात येत आहे.
  Published by:Shreyas
  First published: