मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सराईत गुन्हेगाराने पोलीस जवानाच्या पोटावर केला चॉपरने वार, मनमाडमधील घटना

सराईत गुन्हेगाराने पोलीस जवानाच्या पोटावर केला चॉपरने वार, मनमाडमधील घटना

शासकीय कर्मचारी आणि पोलिसावर हल्ल्य करण्याच्या घटना वारंवार घडत असून अशीच एक धक्कादायक घटना मनमाड शहरात घडली

शासकीय कर्मचारी आणि पोलिसावर हल्ल्य करण्याच्या घटना वारंवार घडत असून अशीच एक धक्कादायक घटना मनमाड शहरात घडली

शासकीय कर्मचारी आणि पोलिसावर हल्ल्य करण्याच्या घटना वारंवार घडत असून अशीच एक धक्कादायक घटना मनमाड शहरात घडली

मनमाड, 01 डिसेंबर : शासकीय कर्मचारी आणि पोलिसावर हल्ला करण्याच्या घटना वारंवार घडत असून अशीच एक धक्कादायक घटना मनमाड (Manmad ) शहरात घडली. वारंट बजावण्यासाठी गेलेल्या रॅपिड ऍक्शन फोर्सच्या पोलीस जवानांवर (rapid action police) 4 जणांच्या टोळीने चॉपरने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस जवान गंभीर जखमी झाला आहे. त्यांना नाशिकच्या (nashik) खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हा जवान मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रॅपिड ऍक्शन फोर्सचा पोलीस जवान सूरज उगलमुगले ह्याच्याकडे शुभम चुनियन(रा.इदगाह) याला वारंट बजावण्याची जबाबदारी देण्यात आली होती. शुभम हा रेल्वे स्थानकाच्या बाहेर त्याच्या मित्रासोबत एका पान दुकानावर उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरज त्याला वारंट देण्यासाठी गेला असता 'मी वारंट घेणार नाही' असे सांगत शुभमने पोलीस जवानांशी हुज्जतच घातली ECf त्याला शिवीगाळ देखील केली. हा वाद इतका विकोपाला गेला की शुभमने पोलीस जवान सुरज याच्या पोटावर चॉपरने वार केला. घाव वर्मी लागल्यामुळे सुरज जागीच कोसळला. हल्ला केल्यानंतर तिघे आरोपी फरार झाले.

जन्माच्या किती दिवसानंतर मुलांना समजू लागतं आपलं बोलणं; हाव-भावने देतात प्रतिसाद

आपल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच सहय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,गौतम तायडे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सुरजला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सुरजला नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी शुभम चुनियान सोबत फरार झालेल्या तिघा विरुद्ध भादवी कलम 307,353,223 यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रवीण कुमावत याला अटक केली आहे.

डोक्याला हानी पोहोचल्यानंतरही झुरळं कसे काय राहू शकते जिवंत? जाणून घ्या

उर्वरित आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. शुभम चुनियन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हापमर्डर, दरोडा, चोरी, मुली व महिलांची छेड काढणे, पोलिसांवर हल्ला करणे असे एकूण 17 गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली. जर पोलीस सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

First published:
top videos

    Tags: Nashik