मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जन्माच्या किती दिवसानंतर मुलांना समजू लागतं आपलं बोलणं; हाव-भावने देतात प्रतिसाद

जन्माच्या किती दिवसानंतर मुलांना समजू लागतं आपलं बोलणं; हाव-भावने देतात प्रतिसाद

लहान मुलं आवडत नाहीत, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. नवजात   (New-born Babies)   बाळांना पाहण्यात आणि उचलून घेण्यात स्वर्गीय आनंद मिळतो. बाळांची वाढ होताना त्यांच्यामध्ये होणारे लहान-मोठे बदल पालकांना (Parents) तर वेगळाच आनंद देतात.

लहान मुलं आवडत नाहीत, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. नवजात (New-born Babies) बाळांना पाहण्यात आणि उचलून घेण्यात स्वर्गीय आनंद मिळतो. बाळांची वाढ होताना त्यांच्यामध्ये होणारे लहान-मोठे बदल पालकांना (Parents) तर वेगळाच आनंद देतात.

लहान मुलं आवडत नाहीत, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. नवजात (New-born Babies) बाळांना पाहण्यात आणि उचलून घेण्यात स्वर्गीय आनंद मिळतो. बाळांची वाढ होताना त्यांच्यामध्ये होणारे लहान-मोठे बदल पालकांना (Parents) तर वेगळाच आनंद देतात.

पुढे वाचा ...

 मुंबई,1 डिसेंबर-  लहान मुलं आवडत नाहीत, अशी व्यक्ती सापडणं कठीण आहे. नवजात   (New-born Babies)   बाळांना पाहण्यात आणि उचलून घेण्यात स्वर्गीय आनंद मिळतो. बाळांची वाढ होताना त्यांच्यामध्ये होणारे लहान-मोठे बदल पालकांना (Parents) तर वेगळाच आनंद देतात. हसऱ्या-खेळत्या बाळाला पाहिलं की कुणाचाही मूड क्षणार्धात ठीक होऊ शकतो. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या या बाळांना जन्मानंतर सर्व मानवी हावभाव टप्प्याटप्प्याने समजू लागतात. याबाबत सुरू असलेल्या अभ्यासात एक नवीन गोष्ट समोर आली आहे. मुलं जन्माला येताच त्यांना हसवणाऱ्या गोष्टी समजत नाहीत. त्यांना सेन्स ऑफ ह्युमरची  (Sense of Humour)  जाणीव नसते. त्यांना ही समज येण्यासाठी जन्मानंतर साधारण एक महिन्याचा कालावधी लागतो.

यूकेतल्या ब्रिस्टल विद्यापीठातल्या (University of Bristol) संशोधकांनी हे संशोधन केलं असून, बिहेवियर रिसर्च मेथड्स (Behavior Research Methods) या जर्नलमध्ये ते प्रकाशित करण्यात आलं आहे. मानसशास्त्रज्ञांना आशा आहे की, त्यांचा अभ्यास बालकांच्या विकासातला फरक शोधण्यासाठी उपयुक्त ठरेल.

करण्यात आला विशेष सर्व्हे

या इंटरनॅशनल अर्ली ह्युमर सर्व्हेमध्ये (International Early Humor Survey) संशोधकांनी 0 ते 47 महिने वयोगटातल्या 671 बाळांचं निरीक्षण केलं. जन्मानंतर मुलांना किती कालावधीमध्ये विनोदाची समज विकसित होते, याचा शोध घेणं हा त्यामागचा उद्देश होता.

(हे वाचा:Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित)  

एक ते दोन महीन्यांनी येते भावभावनांची समज

वेगवेगळ्या वयोगटातल्या बाळांनी विविध 21 प्रकारचे विनोद ओळखल्याचं संशोधकांच्या निदर्शनास आलं. सर्वांत पहिल्यांदा बाळ साधारण एक महिन्याचं झाल्यानंतर त्याला विनोद समजू शकतो. सर्व्हेत सहभागी असलेली निम्मी मुलं 2 महिने पूर्ण झाल्यानंतर या टप्प्यावर पोहोचली होती. 50 टक्के मुलांना एखाद्या कारणासाठी स्वतःच हसण्यासाठी 11 महिन्यांपर्यंतचा कालावधी लागला.

का वर्षापर्यंत समजू लागतात सर्व विनोदी भावना

12 महिन्यांपेक्षा कमी वयाची बाळं खेळताना समोरच्या व्यक्तीच्या बहुतेक हावभावांना प्रतिसाद देतात. डोकावून पाहणं, गुदगुल्या करणं, गमतीशीर चेहरा करणं, विचित्र आवाज काढणं, या गोष्टींची त्यांना चांगली समज येते. ती स्वत:देखील त्याचा वापर करण्यास शिकतात. एक वर्षानंतर ही समज आणखी उच्च पातळीवर जाते.

केव्हा होतो जास्त विकास

जेव्हा बाळ त्याच्या गुडघ्यावर रांगू लागते तेव्हा त्याच्यामध्ये हसण्याची भावना अधिक विकसित होत जाते. संशोधकांनी सर्व्हेतल्या लहान बाळांना विविध प्रकारची विनोदी वाक्यं आणि शब्द ऐकवले असता, त्यांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय काहींना तर रागात बोललेलं किंवा अपमानित करणारे विनोदही समजल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

(हे वाचा:उपवासाच्या आधी व्यायाम केल्याने आरोग्याला मिळतो अधिक फायदा)  

मुलांच्या विकासाच्या अभ्यासासाठी होणार फायदा

तीन वर्षांच्या मुलांना आणखी गुंतागुंतीचे विनोद आणि खोड्या समजतात आणि ती इतरांनाही हसवू शकतात, असं या संशोधनातून समोर आलं. संशोधकांचं म्हणणं आहे की, मुलांच्या सोशल लाइफच्या दृष्टीनं (Social Life) विनोदाची भावना योग्य पद्धतीनं विकसित होणं अतिशय महत्त्वाचं आहे. योग्य वेळी विनोदविषयक भावभावना विकसित झाल्यास मुलांची कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता चांगली होते.

संशोधक म्हणतात, की विनोद ही एक जटिल प्रक्रिया आहे. ती लहान मुलांमध्ये वयाच्या पहिल्या चार वर्षांपर्यंत चांगल्या प्रकारे विकसित होते. सर्वांत पहिला विनोद बाळांना कसा समजतो हे जाणून घेण्यासाठी आपण साधनं विकसित करणं गरजेचं आहे. त्याच्या मदतीनं मुलांचा विकास, संज्ञानात्मक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याच्या बाबतीत विनोद किती उपयुक्त ठरतो, हेही कळू शकेल.

First published:

Tags: Lifestyle, Small baby