मराठी बातम्या /बातम्या /Viral /डोक्याला हानी पोहोचल्यानंतरही झुरळ कसे काय राहू शकते जिवंत? जाणून घ्या

डोक्याला हानी पोहोचल्यानंतरही झुरळ कसे काय राहू शकते जिवंत? जाणून घ्या

Cockroach

Cockroach

झुरळं (Cockroach) शिरच्छेद झाल्यानंतर म्हणजेच डोक्याला हानी (Head Damage) पोहोचल्यानंतरदेखील ती सुमारे 9 दिवस जिवंत राहू शकतात.

    नवी दिल्ली, 1 डिसेंबर:  घरामध्ये एखादं जरी झुरळ (Cockroach) दिसलं, तरी आपल्याला किळसवाणं वाटतं. तसं पाहायला गेलं, तर घरात झुरळांचं वास्तव्य ही सर्वसामान्य बाब आहे. परंतु, काही जणांना झुरळाची भीती वाटते. घरातली झुरळं नाहीशी होण्यासाठी आपण पेस्ट कंट्रोल (Pest Control), औषध फवारणीसारख्या अनेक उपाययोजना करतो. घरातल्या लहान मुलांच्या (Children) आरोग्याच्या दृष्टीनं झुरळं घातक ठरू शकतात. लहान मुलांमधली अॅलर्जी, अस्थमा यांसारख्या आजारांसाठी झुरळं कारणीभूत असतात. झुरळांमुळं 33 विविध प्रकारचे बॅक्टेरिया (Bacteria) पसरतात. त्यामुळे झुरळांवर वेळीच नियंत्रण आवश्यक असतं. झुरळांविषयी अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे त्यांचा शिरच्छेद झाल्यानंतर म्हणजेच डोक्याला हानी (Head Damage) पोहोचल्यानंतरदेखील ती सुमारे 9 दिवस जिवंत राहू शकतात. अर्थात त्यांची शरीररचना यासाठी कारणीभूत असते. याबाबतची माहिती `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केली आहे.

    सुमारे 12 ते 30 दशलक्ष वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर झुरळांचं अस्तित्व आहे. आज जगभरात झुरळांच्या 4600 प्रजाती आढळतात. त्यापैकी केवळ 30 प्रजाती मानवी अधिवासात आढळतात. झुरळाची शरीररचना पाहता, त्याला एकूण 18 पाय असतात. माणसांप्रमाणे झुरळांच्या डोक्यावर केस असतात. झुरळाचा एखादा पाय तुटला, तर त्या ठिकाणी दुसरा पाय येतो. सर्वसामान्यपणे झुरळांची लांबी दीड ते 2 इंच असते. परंतु, दक्षिण अमेरिकेत (South America) जगातलं सर्वांत मोठं 6 इंच लांबीचं झुरळ आढळलं होतं. झुरळं त्यांचा श्वास 40 मिनिटांपर्यंत रोखून धरू शकतात. त्यामुळे ती पाण्यात 30 मिनिटांपर्यंत जिवंत राहू शकतात. झुरळांचं आयुर्मान सरासरी 1 वर्ष असतं. झुरळं प्रतिसेकंद 5 मीटर वेगानं धावू शकतात. पाल आणि कोळी हे झुरळांचे कट्टर वैरी समजले जातात.

    झुरळं कोणतीही गोष्ट अगदी सहजपणे खाऊ शकतात. साबण, भितींवरचा रंग, पुस्तकं, चामडं, ग्रीस आणि अगदी माणसाच्या डोक्यावरील केसही झुरळं खातात. त्यातही झुरळांना दारू (Alcohol) विशेष आवडते. झुरळ पाहिल्यावर किळस वाटणं हे स्वाभाविक असलं तरी आश्चर्याची बाब म्हणजे चीन, थायलंडमध्ये झुरळं फ्राय करून खाल्ली जातात.

    झुरळाच्या डोक्याला हानी पोहोचली, तरी ते सुमारे 9 दिवस जिवंत राहू शकतं. हे कसं शक्य आहे? ते श्वास कसा घेईल, असे प्रश्न तुमच्या मनात आलेच असतील. परंतु, झुरळाची शरीररचना वैशिष्ट्यपूर्ण असते. झुरळं नाकानं श्वास (Breathing) घेत नाहीत. त्यांच्या शरीरावर लहान छिद्रं असतात. त्यांद्वारे ती श्वास घेतात. त्यामुळे डोक्याला हानी झाली तरी ती 9 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. अर्थात यामागे अजून एक कारण आहे. झुरळं डोक्याच्या साह्याने अन्न-पाणी सेवन करतात. या क्रियेदरम्यान ती त्यांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात प्रथिनांची (Protein) निर्मिती करतात. त्यामुळे त्यांचं डोकं नष्ट झालं तरी अन्न-पाण्याविना ती 9 दिवस जिवंत राहू शकतात आणि त्यानंतर अन्न-पाण्याविना त्यांचा मृत्यू होतो. याशिवाय झुरळ हा कीटक अन्य प्राणी, कीटकांच्या तुलनेत सर्वाधिक फार्ट करतो. दर 15 मिनिटांनी झुरळ पादतं. हे त्याचं आगळं वैशिष्ट्यच.

    First published:
    top videos