Home /News /maharashtra /

मुंबईत आतापर्यंत 800 मृत्यू, रुग्णसंख्या 22583; पुण्यातही रुग्ण वाढले; आता नवा प्लॅन

मुंबईत आतापर्यंत 800 मृत्यू, रुग्णसंख्या 22583; पुण्यातही रुग्ण वाढले; आता नवा प्लॅन

रशियाने फक्त 38 लोकांवरच त्याचा प्रयोग केल्याचंही सांगितलं जात होतं.

रशियाने फक्त 38 लोकांवरच त्याचा प्रयोग केल्याचंही सांगितलं जात होतं.

मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या साडेबावीस हजारावर पोहोचली आहे. आज एकाच दिवसात 1411 रुग्ण आढळून आले. पुण्यातही रुग्णसंख्या वाढली असून आता कोरोना प्रतिबंधासाठी नवा प्लॅन आखण्यात येत आहे.

    मुंबई, 19 मे : मुंबईत कोरोना रुग्णाची संख्या साडेबावीस हजारावर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 800 मृत्यू झाला. मुंबईत आज एकाच दिवसात 1411 रुग्ण आढळून आले. त्यामुळे कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णाची संख्या 22563 वर पोहोचली आहे. Coronavirus मुळे आज 43 लोकांचा मृत्यू झाला असून आजवर मुंबईत एकूण 800 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 600जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 6816 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. पुण्यातही रुग्ण वाढले पुण्यात दिवसभरात 149 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. पुण्यात आज 8 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 110 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  156 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 43 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.  पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3747 झाली आहे आतापर्यंत 207 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण 1920 जणांना बरं होऊन घरी सोडण्यात आलं आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनचा पुण्यात नवा प्लॅन पुणे परिसरात आता मायक्रो कंटेन्मेंट झोननुसार प्रतिबंधांची नियमावली करण्यात येत आहे. या छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनचे नियम कडक असतील, तर इतरत्र व्यवहारांना सुरुवात करण्यास परवानगी देण्यात येईल. कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षाही रद्द होणार? UGC ला राज्याकडून पत्र प्रतिबंधित क्षेत्रात केवळ जीवनावश्यक सुविधा सुरू राहणार. यामध्ये दूध, किराणा, भाजीपाला, मेडिकल दुकाने, दवाखाने, स्वयंपाकाचा गॅस या व्यतिरिक्त इतर सुविधांना परवानगी नाही. 31 तारखेपर्यंतच्या लाॅकडाऊनसाठी नवी नियमावली तयार करण्यात येईल. त्यामध्ये पथारी व्यावसायिकांनाही ठराविक रस्ते वगळता व्यवसाय करता येणार आहे. आरोग्यमंत्र्यांचे रुग्णवाढीचे संकेत कोरोनाची स्थिती सरकारच्या ताब्यात आहे. १ लाख बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेत. मात्र असं असलं तरी घाबरण्याचे कारण नाही. सरकारी हॉस्पिटल्समधली 80 टक्के बेड्स सरकारने ताब्यात घेतल्याची माहिती त्यांनी आज दिली. मृत्यूदर कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. हे दिर्घकाळ चालणारं संकट असल्याने लोकांनी घाबरून चालणार नाही. धीराने आणि धैर्याने त्यांनी मुकाबला केला पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या 4 गंभीर आजार तरी कोरोनापुढे मानली नाही हार; 84व्या वयात फक्त आठवणींनी लढा जिंकला

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या