Home /News /mumbai /

धक्कादायक: ठाण्यातल्या कोरोना योद्ध्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही

धक्कादायक: ठाण्यातल्या कोरोना योद्ध्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही

यामुळे ठाणे महानगर पालिकेचे 70 टक्के आरोग्य कर्मचारी कोणत्याही क्षणी काम बंद करु शकतील अशी परिस्थिती एकंदर ठाण्यात निर्माण झाली आहे.

  ठाणे 19 मे: : एकीकडे करोना योद्धा म्हणुन आरोग्य कर्मचारी डाॅक्टर, नर्सेस आणि कर्मचा-यांचा गुणगौरव केला जातोय तर दुसरीकडे मात्र ठाणे महानगरपालिकेतील जवळपास 70 टक्के आरोग्य सेवा कर्मचा-यांना गेल्या 3 महिन्यांपासून वेतन दिलं गेलं नाहीये असा धक्कादायक खुलासा ठाणे महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते आणि विद्यमान नगरसेवक मिलिंद पाटील यांनी केला आहे. यामुळे ठाणे महानगर पालिकेचे 70 टक्के आरोग्य कर्मचारी कोणत्याही क्षणी काम बंद करु शकतील अशी परिस्थिती एकंदर ठाण्यात निर्माण झाली आहे. कोरोना महामारीला सुरुवात झाल्यापासून ठाणे महानगर पालिकेच्या आरोग्य सेवेत असलेले कर्मचारी रात्रीचा दिवस करुन आपली सेवा बजावत आहेत. त्यामध्ये पालिकेच्या सेवेत असलेल्या कार्डीयाक रुग्णवाहिका चालकांचाही समावेश आहे. ठाणे पालिकेच्या सेवेते कार्डीया रुग्णवाहिका चालविणारे 26 चालक आहेत. त्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वेतनच देण्यात आलेले नाही. तर, सुमारे 200 पेक्षा अधिक आशा स्वयंसेविका या कोरोना बाधीत क्षेत्रामध्ये सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. तसेच, विविध आरोग्य केंद्रातील नर्स, वॉर्ड बॉय हे कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्व्हे, स्क्रिनिंग आदी कामे करीत आहेत. तर, विविध आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर्स प्रचंड धोका पत्करुन थेट रुग्णांच्या संपर्कात जात आहेत. त्यांनाही वेतन देण्यात आलेले नाही.  उष्मा मोठ्या प्रमाणात वाढलेला असतानाही कोणत्याही प्रकारची तक्रार न करता हे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. जो भाग प्रतिबंधीत (कॅन्टोन्मेंट) केला आहे. तेथेही हे कर्मचारी जीवावर उदार होऊन जात आहेत अमित ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र,'तुमच्या 'कोरोना योद्धे' विधानाला अर्थ नाही'त्यांना साधा एन 95 चा मास्कही दिला जात नाही. साधा एक मास्क दिला जात आहे. हँडग्लोव्हज, हँडसॅनिटायझर, सर्जिकल कॅप किंवा तत्सम कोणत्याही प्रकारची साधने दिली जात नाहीत. त्यातच विभागांमध्ये विविध आरोग्य सर्व्हे करणार्‍या नर्स या 45 वयाच्या पुढील आहेत. हा सर्वे केल्यानंतर त्या थेट आपल्या घरात जात आहेत. तर डॉक्टर्ससाठी स्वतंत्र क्वारंटाईन सेंटर आवश्यक असतानाही त्यांना ते उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. लॉकडाउन 4.0 मध्ये नवे नियम नवीन बदल, रेड झोनमध्ये आता...
   त्यामुळे त्यांच्यासह या नर्स आणि कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्याची कोणतीही जाणीव आरोग्य अधिका-यांना नाहीये. या कर्मचार्‍यांना वेतनही अदा केले जात नाही. त्यामुळे डॉक्टर्ससह गोरगरीब नर्स, आशा स्वयंसेविका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक, यांच्या जीवाशी खेळणार्‍या ठाणे महानगर पालिकेच्या वरीष्ठ आरोग्य अधिका-यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी मिलींद पाटील यांनी केलीये.
  तर या संदर्भात सगळी माहिती घेऊन तातडीने कार्यवाही करू अशी प्रतिक्रिया ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: TMC

  पुढील बातम्या