नांदेड, 04 जानेवारी: नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या हदगाव (Hadgaon) तालुक्यातील वडगाव याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी एका प्रेमीयुगुलानं विष प्राशन करत आपल्या आयुष्याचा भयावह शेवट (Couple commits suicide by drinking poison) केला आहे. संबंधित तरुणाने मध्यरात्री आपल्या मोबाइलवरून स्वत:च्या श्रद्धांजलीचे फोटो व्हॉट्सअॅपला स्टेटस (Whatsapp status) ठेवत टोकाच पाऊल उचचलं आहे. सोमवारी पहाटे काही मित्रांनी त्याचं स्टेटस पाहून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही फोन उचचला नाही. त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित प्रेमीयुगुलाने रविवारी मध्यरात्री वडगाव येथील शेतशिवारात जाऊन आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास दोघांचेही मृतदेह आढळले आहेत. ही घटना उघडकीस येताच याची माहिती तामसा पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत, शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे. हेही वाचा- VIDEO: खुल्लम खुला प्यार करेंगे, औरंगाबादेत चालत्या दुचाकीवर कपलचा KISSING सीन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हदगाव तालुक्यातील वडगाव येथील एका 22 वर्षीय युवकाचं गावातील एका 18 वर्षीय युवतीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. पण घरच्यांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला. त्यामुळे हे प्रेमीयुगुल गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होतं. अशात त्यांनी रविवारी रात्री वडगाव येथील शेतशिवारात जाऊन विष प्राशन करत आपल्या प्रेमाचा भयावह शेवट केला आहे. हेही वाचा- 21 वर्षीय तरुणीवर भरदिवसा सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना तत्पूर्वी दोघांनीही आपापल्या फोनवरून स्वत:च्याच श्रद्धांजलीचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी या प्रेमीयुगुलाच्या काही मित्रांनी हे स्टेटस पाहिलं आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तामसा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.