जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / अंबरनाथ: 21 वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना

अंबरनाथ: 21 वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना

अंबरनाथ: 21 वर्षीय तरुणीवर दिवसाढवळ्या सामूहिक बलात्कार; तिघांनी आळीपाळीने दिल्या नरक यातना

Gang Rape in Ambernath: अंबरनाथमध्ये तीन जणांनी एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार (3 friends gang raped young woman) केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंबरनाथ, 03 जानेवारी: नववर्षाच्या पहिल्याचं दिवशी अंबरनाथमध्ये एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता अंबरनाथ शहरात एक सामूहिक बलात्काराची (Gang rape in Ambernath) घटना समोर आली आहे. तीन जणांनी एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार (3 friends gang raped young woman) केला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत तिन्ही नराधम आरोपींच्या मुसक्या आवळल्या (3 Accused Arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत. खरंतर, काही दिवसांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 33 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. संबंधित घटनेनं  संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतर आता नववर्षात अंबरनाथ शहरात सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. रविवारी दुपारी अंबरनाथ एमआयडीसी येथील जीआयपी डॅम परिसरात पीडित तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. हनुमान हिलम, विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी असं अटक केलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. हेही वाचा- जन्मदात्यांसोबत क्रूरतेचा कळस; मुलाने कोयत्याने आईवर केले वार, बापाची छाटली बोटं आरोपी हनुमान हिलम हा पीडित तरुणीच्या ओळखीचा आहे. हिलम यानेच रविवारी दुपारी पीडित तरुणीला अंबरनाथ एमआयडीसी येथील जीआयपी डॅम परिसरात बोलावलं होतं. पीडित तरुणी ही कल्याण येथील रहिवासी आहे. तर ती सध्या अंबरनाथमधील एका दुकानात काम करते. घटनेच्या दिवशी आरोपी मित्र हनुमान हिलम हा आपले मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांच्यासोबत जीआयपी डॅम परिसरात दारू पिण्यासाठी बसला होता. याचदरम्यान हनुमान याने पीडित तरुणीला फोन करून जीआयपी डॅम परिसरात बोलावलं. हेही वाचा- कामासाठी बोलावून आश्रम शाळेतील मुलीसोबत अधिक्षकाचं विकृत कृत्य; पालघरमधील घटना पीडित तरुणी याठिकाणी आली असता आरोपी हनुमान याने पीडितेला जबरदस्ती करत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याचे मित्र विश्वास आणि जावेद यांनीही तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. हा सर्व प्रकार रविवारी दुपारी घडला आहे. या घटनेनंतर भेदरलेल्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन जाऊन याबाबत तक्रार दाखल केली आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. घटनेनंतर अवघ्या 24 तासाच्या आत पोलिसांनी मुख्य आरोपी हनुमान हिलम याच्यासह त्याचे मित्र विश्वास मढवी आणि जावेद अन्सारी यांना  बेड्या ठोकल्या. या तिघांना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात