मुंबई, 14 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus) राज्यातील सगळ्या शाळांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढलं आहे. सोमवारपासून पुढची सूचना मिळेपर्यंत 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील, असं या परिपत्रकात म्हटलं आहे. कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत.शासनाच्या, महापालिकेच्या आणि खासगी शाळाही बंद ठेवण्यात येणार आहेत.
दहावी बारावीच्या परीक्षा मात्र ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतील. यापूर्वी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिमखाना, चित्रपटगृह बंद ठेवण्यात येणार आहेत. तर गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
या कायद्याचा भंग केल्यास कारवाई होऊ शकते. शाळा, कॉलेजना सुट्ट्या जाहीर केल्यात. विद्यार्थ्यांनी सुट्ट्या म्हणून घराबाहेर पडू नये, असं आवाहन आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाव्हायरस रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. नागपुरात (Nagpur) कोरोनाव्हायरसचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4 झाली आहे, नागपुरात धोका वाढला आहे. तर दुसरीकडे पुण्याहून दिलासादायक बातमी आहे. पुण्यातील दहाही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
संबंधित बातम्या
'कोरोना व्हायरस'चा मनसेला फटका, गुढीपाडवा मेळावा रद्द
कोरोना प्रभावित देशातून आलेले 335 प्रवासी बेपत्ता, तपासणी न केल्याने धोका वाढला
'कोरोना'वर मात केलेल्या रुग्णाला पुन्हा व्हायरसची लागण होऊ शकते का?