मराठी बातम्या /बातम्या /देश /4 गंभीर आजार तरी कोरोनापुढे मानली नाही हार; 84 व्या वयात फक्त आठवणींनीच लढा जिंकला

4 गंभीर आजार तरी कोरोनापुढे मानली नाही हार; 84 व्या वयात फक्त आठवणींनीच लढा जिंकला

 80 पार ही व्यक्ती कोरोनाव्हायरसच्या लढाईत तब्बल 24 दिवस जीवनमृत्यूंशी झुंज देत होती.

 80 पार ही व्यक्ती कोरोनाव्हायरसच्या लढाईत तब्बल 24 दिवस जीवनमृत्यूंशी झुंज देत होती.

 80 पार ही व्यक्ती कोरोनाव्हायरसच्या लढाईत तब्बल 24 दिवस जीवनमृत्यूंशी झुंज देत होती.

कोलकाता 19 मे : वय वर्ष 84... डायबेटिज, हाय ब्लड प्रेशर, सीओपीडी (श्वसनसंबंधी आजार) आणि हृदयासंबंधी आजार आणि त्यानंतर कोरोनाही... कोणत्याही व्यक्तीनं जगण्याची आशाच सोडली असती. मात्र त्यानंतरही या व्यक्तीनं कोरोनाव्हायरससमोर हार मानली नाही. वयोमानानुसार शरीर थकलं असलं, तरी जगण्याची इच्छाशक्ती संपलेली नाही, हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्यांवर कोरोनाव्हायरसचा परिणाम जास्त होतो, हे ऐकून घाबरलेल्यांसाठी हे आजोबा म्हणजे प्रेरणा आहेत.

हे वाचा - फक्त पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक्सनी ठणठणीत झाले कोरोना रुग्ण; प्रशासनही हैराण

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, कोलकात्यातील (kolkata) 84 वर्षांचे तपन मित्रा. त्यांना डायबेटिज, उच्च रक्तदाब, हृदयासंबंधी आजार आणि सीओपीडी हा श्वसनसंबंधी आजार आहे. असे गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर कोरोनाव्हायरचा परिणाम जास्त होतो. रमेश यांनाही कोरोनाव्हायरसने विळखा घातला मात्र त्यांनी आपल्या या आजारांमुळे कोरोनाला आपल्यावर भारी पडू दिलं नाही. हे आजार असतानाही त्यांनी कोरोनावर मात करून दाखवली आहे.

80 पार तपन मित्रा कोरोनाव्हायरसच्या लढाईत तब्बल 24 दिवस जीवनमृत्यूंशी झुंज देत होते. त्यांना दोनवेळा आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. जगण्याची इच्छा, सुखद आठवणींनी त्यांनी कोरोनावर मात केली आहे.

हे वाचा - लसीशिवायच होणार Coronavirus चा नाश; WHO च्या माजी संचालकांचा दावा

मित्रा हे कॉर्पोरेट जगतातील एक सन्मानीय व्यक्ती आहेत. ते कोलकाता रोइंग क्लबचे अध्यक्षही आहेत. हल्दिया पेट्रोकेमिकल्सचे अध्यक्ष आणि भारतीय उद्योग परिसंघाच्या पूर्व क्षेत्रातील अध्यक्ष राहिलेले मित्रा म्हणाले, "बेडवर मी आनंदी आणि चांगले क्षण आठवण्याचा प्रयत्न केला. प्रवास आणि लोकांची आठवण काढत मी जगलो. यामुळे मला मानसिक तणावापासून दूर राहण्यास मदत मिळाली"

कोरोना रुग्णांना फक्त शारीरिक नाही तर मानसिक समस्यांचाही सामना करावा लागतो आहे. कोरोनाशी लढण्यासाठी औषधांसह मानसिक ताकदही मिळणं गरजेचं आहे. अशा मानसिक सकारात्मक ऊर्जेसह कोरोनावर मात करणं शक्य आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published:
top videos