Home /News /maharashtra /

मनसेच्या आमदाराने दिली राजेश टोपेंना 'कोरोना' फॉर्म्युल्याची आठवण, डोंबिवलीसाठी केली 'ही' मागणी

मनसेच्या आमदाराने दिली राजेश टोपेंना 'कोरोना' फॉर्म्युल्याची आठवण, डोंबिवलीसाठी केली 'ही' मागणी

कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचा माग काढण्यात यंत्रणा अपुरी पडत आहे

डोंबिवली, 10 एप्रिल : मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मुंबईच्या उपनगरातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांची संख्या ही 49 वर पोहोचली आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 4T फॉर्म्युल्याची आठवण करून देत डोंबिवलीसाठी मागणी केली आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री राजेश टोपे यांना ट्वीट केले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये राजेश टोपे यांनी फॉर्म्युला सांगून तो सापडत नाही आहे आणि जशी धारावीची पाहणी केली तशी केडीएमसीची पाहणी गरजेचं आहे, अशी मागणी केली आहे. तसंच, कल्याण डोंबिवली परिसरात कोरोनाबाधित रुग्णांचा माग काढण्यात यंत्रणा अपुरी पडत आहे, अशी तक्रारही पाटील यांनी केली. दरम्यान, डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात एकाच दिवशी 6 रुग्ण आढळल्याची माहिती समोर  आली आहे. डोंबिवलीतील आयरे आणि तुकारामनगर परिसरातील रुग्ण जास्त असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याच परिसरात काही  जणांना ताप येत असल्याने केडीएमसीकडून तपासणी सुद्धा चालू गेली आहे. हेही वाचा -असं नक्की काय घडलं की सलमाननं अचानक शेअर केले कब्रस्तानाचे PHOTOS तर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत  गेल्या 24 तासांमध्ये नवे रुग्ण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. डोंबिवली परिसरात 5 रुग्ण तर कल्याणमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. डोंबिवलीतील 5 रुग्ण हे तुकारामनगर परिसरातील असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.  कल्याण डोंबिवलीत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 49 वर पोहोचला आहे. डोंबिवलीत 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा लागण झाली आहे. तर रुग्णामध्ये महिलांची संख्या वाढताना दिसत आहे. या सहा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्य, परिसरातील नागरिक आणि इतर लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे. केडीएमसीकडून हेल्पलाईन नंबर जारी हेही वाचा -मोठी बातमी, लॉकडाउन किती वाढणार? उद्धव ठाकरे मांडणार मोदींकडे 'हा' प्रस्ताव दरम्यान, कल्याण डोंबिवली परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण चालू असून नागरिकांनी घाबरून न जाता सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळून आल्‍यास त्‍वरीत महापालिकेच्‍या रूग्‍णालयाशी संपर्क साधावा, महापालिकेच्या आरोग्य पथकास सहकार्य करावे तसंच अधिक माहितीकरीता बाई रूक्‍मिणीबाई रूग्‍णालय, कल्‍याण येथील 0251- 2310700 व शास्‍त्रीनगर सामान्‍य रूग्‍णालय, डोंबिवली येथील 0251- 2481073 व 0251- 2495338 या हेल्‍पलाईनवर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या