सलमाननं बंद कब्रस्तानाचे फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘छान! सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य समजून घेतल्याबद्दल धन्यवाद. देव सर्वांचं रक्षण करो. #IndiaFightsCorona’ सलमाननं शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहेत. कब्रस्तान बंद करण्याच्या या निर्णयाचं लोक खूप कौतुक करताना दिसत आहेत आणि कोरोना व्हायरसच्या या संकटात एकजूट दाखवल्याबाबत आभारही मानताना दिसत आहेत. Lockdown मध्ये गुगलवर काय सर्च करत आहेत भारतीय, वाचून बसेल धक्का
भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर सलमाननं त्याच्या आगामी सिनेमाचं शूटिंग सुद्धा थांबवलं होतं. याशिवाय सरकार कडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करुन तो मागच्या बऱ्याच दिवसांपासून घरी आहे आणि चाहत्यांनाही घरी राहण्याचं आवाहन करताना दिसत आहे. याशिवाय सिनेइंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या 16 हजार कामगाराच्या पोटोपाण्याची प्रश्न निर्माण झाल्यावर त्यानं तत्काळ त्यांना मदतीचा हातही दिला. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन आणखी काही काळ वाढवलं जाण्याची शक्यता आहे. (संपादन : मेघा जेठे.) Lockdownमध्ये करिनाला आली बीचची आठवण, शेअर केला Bikini PhotoView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan